झिम्बाब्वेनं पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये धडक दिली तर ऑस्ट्रेलिया बाहेर…

SHARE:

कोलंबो : टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज झिम्बाब्वे आणि आर्यलंड यांच्यात होणारा सामना ऑस्ट्रेलियासाठी ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा होता. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यानं ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. सामना रद्द झाल्यामुळे झिम्बाब्वे आणि आर्यलंड यांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यामुळे झिम्बाब्वेचे ५ गुण झाले आहेत. झिम्बाब्वेनं सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. तर ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. ३ सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाचे केवळ २ गुण आहेत. आता अखेरचा सामना ऑस्ट्रेलियासाठी केवळ औपचारिकता असेल. झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्याकडून झालेले पराभव ऑस्ट्रेलियाला महागात पडले आहेत.

आर्यलंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पाऊस न थांबल्यानं एकही चेंडू टाकला गेला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळाला. सामना रद्द झाला असला तरी झिम्बाब्वेच्या संघानं ५ गुणांसह सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. तर आर्यलंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यांच्या सोबतच ऑस्ट्रेलियाचा संघदेखील स्पर्धेतून बाद झाला आहे. ब गटातून श्रीलंका आणि झिम्बाब्वेनं सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. आर्यलंड, ऑस्ट्रेलियासह ओमानचंही आव्हान संपुष्टात आलं आहे.

 

Leave a Comment

अधिक वाचा