देशात एआय तंत्रज्ञानामूळे ९.२ कोटी पारंपरिक नोकऱ्यांवर परिणाम होणार, तर १७ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात

SHARE:

नवी दिल्ली – देशात एआय तंत्रज्ञानामूळे ९.२  कोटी पारंपरिक नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, तर १७ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, असे, इन्फोसिसचे चेअरमन नंदन नीलकणी यांनी म्हटले आहे. देशात आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे काही नोकऱ्या कमी होतील, तर काही ठिकाणी नोकर्या वाढतील. देशात कित्येक तरुणांसाठी आजकाल नोकरी मिळवणे खूप आव्हानात्मक झाले आहे. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तरुणांना करिअर सेट करणे कठीण वाटत असताना, इन्फोसिसचे चेअरमन नंदन नीलकणी यांनी भारत देशात भविष्यात नोकरीच्या संधी वाढतील की कमी होतील याचे स्पष्ट उत्तर दिले आहे. हे वक्तव्य आयटी क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या तरुणांसाठी खूप महत्त्वाचे ठरत आहे.

भारत देशात आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे नोकऱ्या कमी होतील की वाढतील, हा प्रश्न सध्या सर्व देशात चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इन्फोसिस आयटी कंपनीच्या एका कार्यक्रमात भविष्यातील तंत्रज्ञान आणि रोजगार याबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वेग आधीपेक्षा खूप जास्त असल्यामुळे उद्योग, व्यवसाय आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांवर त्याचा मोठा परिणाम दिसणार आहे. इन्फोसिसचे चेअरमन नंदन नीलेकणी यांनी म्हटले आहे. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमामुळे इन्फोसिस कंपनी गुंतवणूकीसाठी पुढे आली आहे.

कारण इन्फोसिस या आयटी कंपनीने अमेरिकेतील प्रगत अन्थ्रोपिक एआय आयटी कंपनीसोबत भागीदारी जाहीर केली आहे. या घटनेचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला आहे. आणि इन्फोसिस शेअर प्राईसमध्ये मध्ये वाढ नोंदवली गेली आहे. भारतातील इन्फोसिस कंपनीने सांगितले की एआय तंत्रज्ञान हे पुढील काळात भारत देशात व्यवसाय वाढीचे मुख्य साधन बनणार आहे. कार्यक्रमात बोलताना नंदन नीलकणि म्हणाले की , जगभरात प्रत्येक नवीन तांत्रिक क्रांतीमुळे सुरुवातीला भीती निर्माण होते. मात्र शेवटी त्या नवीन तांत्रिक बदलातून अधिक नवीन संधी तयार होतात. जगभरातील एआय तंत्रज्ञाान काही पारंपरिक कामे कमी करेल, पण त्याच वेळी जगीारात मोठ्या प्रमाणात नवीन करिअर मार्ग, नवीन नोकर्या निर्माण होतील. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनीहा नवीन एआय तंत्रज्ञानाचा बदल स्वीकारून कौशल्य वाढवणे आवश्यक आहे.

इन्फोसिस कंपनीच्या सादरीकरणात सांगण्यात आले की, जगभरातील अनेक कंपन्या त्यांच्या आयटी बजेटपैकी ६० ते ८० टक्के खर्च जुनी लेगेसी सिस्टीम चालवण्यास करत आहेत. ही व्यवस्था महाग आणि शांत आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रणाली वेगाने आधुनिक करता येते. त्यामुळे खर्च कमी होईल, कामाचा वेग वाढणार आहे, आणि उत्पादकता सुधारणार आहे. इन्फोसिस क्यु3 निकालात एआय सेवा ५.५ टक्के महसूल देत असल्याचेही समोर आले आहे. एआय तंत्रज्ञाानामूळेमुळे ऑटोमेशन वाढत असल्याने कोडिंग, टेस्टिंग आणि सपोर्ट सारखी पुनरावृत्तीची कामे एआय मशीन करू लागली आहेत. भारत देशात ९.२ कोटी पारंपरिक आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. फ्रंन्ट अॅन्ड डेव्हलपर्स, क्युए टेस्टर्स, आयटी सपोर्ट स्पेशालिस्ट, आणि ब्लॉकचेन डेव्हलपर्स अशा नवीन पदांच्या नोकर्यांची संख्या वाढणार आहे.

जगभरात व भारत देशात एआय तंत्रज्ञानामूळे मोठ्या प्रमाणात नवीन नोकर्या तयार होणार आहेत. भारत देशात एआय तंत्रज्ञानामूळे आयटी क्षेत्रात १७ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत, असे इन्फोसिस कंपनीचे चेअरमन म्हणाले आहेत. डाटा ॲनोटेटर, एआय इंजिनियर, एआय फॉरेन्सिक ॲनालिस्ट, फॉरवर्ड डिप्लॉयड इंजिनियर, आणि एआय लीडस यांसारख्या नवीन पदाच्या नोकर्या वाढणार आहेत. त्यामूळे भारत देशातील आयटी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामूळे अधिक कौशल्य असलेल्या आणि जास्त पगाराच्या नोकर्या वाढणार आहेत. त्यामुळे जगभरातील व भारत देशातील आयटी उद्योगातील नोकर्या कमी होणार नाही, तर भारत देशात आयटी क्षेत्रात एआय या नव्या तंत्रज्ञानामूळे नव्या स्वरूपात नवीन नोकर्या वाढणार आहेत, व देशातील आयटी क्षेत्र ही विकसित होणार आहे, असे देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिस प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा