दिल्लीत रोबोटिक कुत्र्याच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाल्यामूळे गालगोटिया विद्यापीठाला एआय समिटमधून हाकलले

SHARE:

नवी दिल्ली – दिल्लीत रोबोटिक कुत्र्याच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाल्यामूळे गालगोटिया विद्यापीठाला एआय समिटमधून हाकलले आहे. जगासमोर भारताची शान घालवणाऱ्या गालगोटिया युनिव्हर्सिटीला एआय समिटमधून हाकलण्यात आले आहे. तर त्याचा प्रदर्शनातील स्टॉल बंद करण्यात आला आहे. याप्रकरणात गालगोटिया विद्यापीठाला एआय समिट एक्स्पो रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. देशाची राजधानी दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिट सुरु आहे. यासंदर्भात एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. गालगोटिया विद्यापीठाला एआय समिट एक्स्पो रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे.

रोबोटिक कुत्र्याच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाल्यानंतर गालगोटियास विद्यापीठाला एआय समिट एक्स्पो रिकामा करण्यास सांगण्यात आले. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रेटर नोएडाच्या या संस्थेने तातडीने कारवाई केली आहे. क्लिपमध्ये, विद्यापीठाचे प्रतिनिधी त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उत्पादन म्हणून रोबोटिक कुत्रा सादर करताना दिसत होते. सोशल मीडियावर गालगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नेहा सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्या एका रोबोटिक डॉगला ओरियन असे संबोधून, तो युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसने तयार केल्याचा दावा करताना दिसल्या आहेत.

मात्र, टेक तज्ज्ञांनी तातडीने हा दावा खोटा आहे, असे सांगितले आहे. हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या यूनिट्री कंपनीचा जीओ २  मॉडेल असून तो बाजारात २  ते ३  लाख रुपयांना सहज मिळतो. गालगोटिया विद्यापीठाने शिखर परिषदेत सादर केलेल्या रोबोटिक कुत्र्याची ओळख चीनी रोबोट युनिट्री गो २  म्हणून झाली आहे, जो चीनी रोबोटिक्स फर्म युनिट्री रोबोटिक्सने बनवलेला व्यावसायिकरित्या उपलब्ध मॉडेल आहे. शिखर परिषदेत, रोबोट ओरियन या नावाने सादर करण्यात आला आहे.

एआय इम्पॅक्ट समिटमध्ये चिनी बनावटीच्या रोबोडॉगच्या प्रदर्शनाभोवती झालेल्या वादानंतर, गालगोटिया विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ. ऐश्वर्या श्रीवास्तव म्हणाल्या, आम्ही कधीही तो रोबोडॉग तयार केल्याचा दावा केला नाही; तो आमच्या एआय गुंतवणुकीचा एक भाग होता. तो खूप गैरसमज झाला होता. संस्थेने एक अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. तर ज्यामध्ये विद्यापीठाविरुद्ध अपप्रचाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विद्यापीठाने म्हटले आहे की, रोबोटिक प्रोग्रामिंग हा विद्यार्थ्यांना एआय अॅप्लिकेशन्स कसे तयार करायचे हे शिकवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामुळे त्यांना जगभरात उपलब्ध असलेली साधने आणि संसाधने वापरून वास्तविक-जगातील कौशल्ये विकसित आणि लागू करता येतात.

या प्रकरणावरुन आता देशातील राजकारणही तापले आहे. काँग्रेसने देशातील मोदी सरकारवर टीका केली आहे. चीनच्या रोबोटला भारताचे उत्पादन म्हणून दाखवून मोदी सरकारने जागतिक स्तरावर देशाची फसवणुक केली आहे. चिनी प्रसारमाध्यमेही आता भारतावर हसत आहेत, अशी काँग्रेसने केंद्रातील भाजपा सरकार टीका केली आहे. दुसरीकडे ही समिट केवळ एक तमाशा बनली आहे. भारताच्या टॅलेंटचा वापर करण्याऐवजी भाजपा सरकारकडून चीनच्या उत्पादनांचे प्रदर्शन केले जात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.या वादावर आता राहूल गांधी यांनी देशातील भाजपा सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा