नाशिक – केमिकलचा वापर करून विनापरवाना बनावट कुल्फी बनवणाऱ्या कारखान्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये केमिकल वापरून कुल्फी बनवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. नाशिकमध्ये अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या एका कंपनीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका विनापरवाना कुल्फी कारखान्यावर कडक कारवाई केली आहे. केमिकल्स आणि इतर रासायनिक घटकांचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या हजारो कुल्फी बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आहे. व कुल्फींचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये खाद्यपदार्थांच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात एका कारखान्यात आरोग्यास घातक असलेल्या केमिकलचा वापर करून कुल्फी बनवली जात होती. पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकली आहे. या कारखान्यात कोणताही परवाना नसताना आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात कुल्फी उत्पादन सुरू असल्याचे दिसले आहे. नाशिक पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर हानिकारक केमिकल्स आणि तयार कुल्फी साठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील अहिल्यानगरमध्ये दूध भेसळ करणार्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. आता परत नाशिकमधील हे बनावट केमिकल कुल्फी प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या अन्न भेसळीमुळे राज्यातील नागरिकांच्या, व लहान मुलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यात ही अन्न भेसळ प्रकरणातील घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालूक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणात इगतपूरी पोलिसानी मोठी कारवाई केली आहे.उन्हाळ्याची चाहूल लागताच थंडगार कुल्फीची मागणी खुप वाढते, याच संधीचा फायदा घेत लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.आहे. इगतपुरी तालूक्यातील चर्च हिल परिसरातील एका जुन्या घरात सुरू असलेल्या केमिकल कुल्फीच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. मलाई कुल्फीच्या नावाखाली येथे चक्क घातक रसायनांचा वापर करून कुल्फी तयार केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना इगतपुरीच्या चर्च हिल भागात एका संशयास्पद कुल्फी कारखान्याची माहिती मिळाली होती.
इगतपूरी ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी धाड टाकली आहे. तिथे जे दृश्य दिसले ते पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहे. मलाई कुल्फीसाठी दूध आणि दुधाच्या सायचा वापर होणे अपेक्षित असताना, या कुल्फी कारखान्यात केवळ केमिकल आणि रासायनिक घटकांचा वापर करून कुल्फी बनवली जात होती. उन्हाळ्यात स्वस्तात कुल्फी विकून नफा कमावण्यासाठी अस्वच्छ वातावरणात आणि विनापरवाना हा कुल्फी कारखाना सुरू होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल शहानिशा केल्यानंतरच ही कडक कारवाई केली आहे. या प्रकरणात हजारो तयार कुल्फी माल आणि त्या बनवण्यासाठी लागणारे हानिकारक केमिकल व रासायनिक घटक जप्त करण्यात आले आहेत. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये मलाई कुल्फी म्हणून आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थाचे धक्कादायक वास्तव नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे रासायनिक केमिकल्सचा वापर करून मानवी शरीरास अत्यंत घातक ठरणारी बनावट केमिकल कुल्फी बनवणार्या कारखान्यावर नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली आहे. या कडक कारवाईत इगतपूरी पोलिसांनी २,५०० तयार केलेल्या बनावट कुल्फींचे बॉक्स आणि रासायनिक केमिकल्सचे मोठे डबे जप्त करण्यात आले आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने बनावट कुल्फी कारखान्यावर इगतपुरी ही कडक कारवाई केली आहे. या बनावट केमिकल कुल्फी कारखान्यात तपासणी केली आहे. या कुल्फी कारखान्यात मलाई किंवा दुधाचा साठवणूक केलेला माल सापडला नाही. त्याऐवजी मानवी आरोग्याला हानी पोहोचवणारे कोबिंद कलर पोस्टर, विविध प्रकारचे इसेन्स आणि फ्लेवर कलर्स, इतर रासायनिक घटक, वेगवेगळे केमिकल यांचा वापर करून बनावट कुल्फी या कारखान्यात तयार केली जात होती. हा धक्कादायक प्रकार इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या मार्गाने सूरू होता. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. केवळ फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या केमिकल कुल्फी कारखान्यावर पोलिसांनी कडक कारवाई करून कंपनीतील सर्व साहित्य जप्त केले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवण्यात आल्यावर ही कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. राज्यातील मोठ्या शहरांमधील ही मलाई कुल्फी प्रत्यक्षात अशा केमिकलने बनवली जाते, हे या कारवाईमुळे समोर आले आहे. इगतपुरीतील केमिकल कुल्फी कारखान्यावर धाड टाकल्यानंतर आता पोलिसांनी इतर कुल्फी कारखान्यांवर कडक कारवाई करणार आहे, तपासणी केली जाणार आहे, असे सांगितले आहे. विनापरवाना बनावट कुल्फी कारखाना चालवून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या विनोद कुशवाह याच्यावर इगतपुरी ग्रामीण पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर नाशिक जिल्ह्यात अन्न भेसळ विभाग इमतर कारखान्याचची तपासणी करणार आहे. पोलिसांनी पालकांना लहान मूलांना कुल्फी देण्याबाबत सावधानता बाळगायचे आवाहन केले आहे. बनावट कुल्फी कारखाना कारवाईत जप्त करण्यात आलेल्या २,५०० बनावट कुल्फी माल, आणि जप्त केलेले रासायनिक घटक व वेगवेगळे केमिकल्सचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस या कुल्फी भेसळ रॅकेटमध्ये अजून कोण आरोपी आहेत का? याची चौकशी करत आहेत. या बनावट कुल्फी भेसळ प्रकरणात अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलिस करत आहेत.




