व्यवसाय : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज या दरांनी आकाशाला स्पर्श केला आहे. आजचा सोने आणि चांदीचा काय भाव आहे चला जाणून घेऊया…
सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. महिलांचा अंगावर अनेकदा सोने आणि चांदीचे दागिने पाहायला मिळतात. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले दर पाहून सर्वसमान्यांना सोने आणि चांदी खरेदी करणे न परवडणारे झाले आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा 10 ग्रॅमचा आणि चांदीचा भाव काय आहे…
काही दिवसांपासून सतत सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात आहेर करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागणार आहे. आज तर सोने आणि चांदीच्या भावाने आकाशाला स्पर्श केला आहे.
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांची तर चांदीच्या वाढ ७ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
२० फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५९ हजार १३५ रुपयांवर पोहोतले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ५७ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. आता हे दर पाहून अनेकांना घाम फुटला आहे.




