मुंबई – आज संपूर्ण राज्यातच नव्हे तर जगभऱ्यात शिवजयंती साजरी करण्यात येते. रयतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सोबत असलेल्या मावळ्यांनी आपले सर्वस्व अर्पन केले. त्याच धरती वर आजही असे असंख्य व्यक्ती आहेत की, ज्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात अशे काही पराक्रम केले आहेत की ज्यापासून सामाजिक बांधिलकी जोपासली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर विश्वास ठेवून समाजामध्ये जिवन जगणाऱ्या आणि त्या विचारांनी प्रेरित होऊन सामान्य लोकांची मदत करणारे असंख्य व्यक्ती महाराष्ट्रात आहे.
प्रत्येक व्यक्ती आपआपल्या क्षेत्रात कार्यरत असतात आणि त्याच क्षेत्रात कळत-नकळत कित्येक लोकांची मदत करत असतात. अश्या लोकांचा जर सन्मान झाला तर इतर लोकांना त्यापासून प्रेरणा मिळते व त्यांचसोबत शिवरायांची विचारधारा आणखी बळकट करण्यास मदत मिळेल. या विचारांनी प्रेरित होऊन राज्यात शिवरायांच्या विचारांवर कार्य करणारी शिवरत्न फॉउंडेशन च्या वतीने १९ फेब्रुवारी २०२७ पासून दरवर्षी विविध क्षेत्रात शिवरायांची विचारधारा स्वीकारून कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी शिवरत्न फॉउंडेशन च्या वतीने “शिवरत्न” व “मी मावळा छत्रपतींचा” असे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. राजकारण, समाजकारण, कृषी, क्रीडा, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, कला, विज्ञान, महिला सक्षमीकरण तथा शासकीय सेवा अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचे कार्यक्षेत्र व कार्याचा अभ्यास करून त्यांची निवड करण्यात येणार आहे.
या दोन्ही पुरस्कारांसाठी जी मर्यादा निश्चित करण्यात येणार आहे ते लवकरच घोषित करण्यात येईल. त्यासाठी आवेदन सुद्धा स्वीकारले जातील. दरवर्षी शिवजयंती ला १९ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. शिवरत्न फॉउंडेशन च्या वतीने या बद्दल पत्रकातून माहिती देण्यात आली.




