नाशिकमध्ये सिग्नल तोडल्यास कडक कारवाई होणार, तर शहरात ४० वाहतूक सिग्नलवर सीसीटीव्हीची नजर राहणार

SHARE:

नाशिक – सिग्नल तोडल्यास आता कडक कारवाई होणार, तर शहरात ४० वाहतूक सिग्नलवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे, असे नाशिक पोलिस प्रशासनाने म्हटले आहे. नाशिकमध्ये सिग्नल तोडल्यास ई-चलनद्वारे दंड आकारला जाणार आहे. तर नाशिकमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्याचा नाशिकमधील वाहनचालकांवर नजर राहणार आहे. नाशिक शहरातील ४० वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे नाशिक शहरामध्ये प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

नाशिक शहरातील 40 वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही आज पासून कार्यान्वित होत आहेत. यामुळे नाशिक शहरातील वाहतुकीचे नियम तोडणारे, बेशिस्त वाहनधारक सीसीटीव्हीमध्ये कैद होणार आहे. त्यांना ई-चलनाद्वारे दंड आकारला जाणार आहे. दंडाचा मेसेज मोबाइलवर येणार आहे. शहरात सिग्नल तोडणे, यूटर्न, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेणे, ट्रिपल सीट आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याची नजर सर्व वाहनधारकांवर राहणार आहे, असे नाशिक पोलिस प्रशासनाने म्हटले आहे. नाशिक शहरात अनेक महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. अद्याप ते सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले नव्हते. पोलीस आयुक्तालयाकडून यासंदर्भात स्मार्ट सिटीकडे पाठपुरावा करण्यात येत होता. येत्या काळात सीसीटीव्हीचा उपयोग जास्त प्रमाणात करण्यात येणार आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही आता नाशिक शहरात बसविण्यात आले आहेत.

नव्याने बसविण्यात आलेले सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित केले आहेत. याची जोडणी नाशिक पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. नाशिक पोलीस नियंत्रण कक्षात एलसीडी वॉल उभारली आहे. यावर नाशिक शहरातील बेशिस्त वाहनधारकांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. यासाठी नाशिक वाहतूक शाखेतील अंमलदारांना सीसीटीव्हीच्या आधारे कायदेशीर कारवाई, बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईसह ई-चलनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

त्यामुळे आजपासून टप्प्याटप्प्याने नाशिक शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर ई-चलन अंतर्गत कडक कारवाई होणार आहे. नाशिक शहरातील वाहतूकीचे नियम मोडल्यास सीसीटीव्हीद्वारे त्याची माहिती पोलिसांच्या सीसीसीमध्ये ई-स्वरूपात येणार आहे, त्वरित त्याची पडताळणी करून ई-चलनाद्वारे वाहनचालकांकडून मोठा दंड आकारण्यात येणार आहे, असे नाशिक पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा