पुण्यामध्ये ३५ हजारांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला अटक; अँटी करप्शन ब्युरोची कडक कारवाई

SHARE:

पुणे – ३५ हजारांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे, तर पुण्यात अँटी करप्शन ब्युरोने ही कडक कारवाई केली आहे. पुण्यातील पौडमध्ये ही घटना घडली आहे. पुण्यातील पौड पोलीस स्टेशनच्या एएसआयला ३५ हजाराची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने पकडले आहे. सचिन शिंदे असे या लाचखोर एएसआयचे नाव आहे. पुण्यातील पौड पोलीस स्टेशनच्या एएसआयला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ३५ हजारांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून सचिन शिंदेला अटक केले आहे.

या घटनेमुळे पुण्यातील पौड परिसरात खळबळ उडाली आहे. जर राज्यातील पोलीस अधिकारी लाच घेत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पौड मध्ये एका अपघातानंतर २ वाहनांतील व्यक्तींमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात गाडी जमा करुन न घेणे, अटक करुन न घेणे आणि इतर कायदेशीर कारवाईत मदत करणे यासाठी एका पुण्यातील पोलीस अधिकाऱ्याने ही लाच मागितली होती.

पुण्यातील तक्रारदाराने यासंबंधी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करुन एसीबीने सापळा रचून पोलिस अधिकार्यास लाच घेताना पकडले आहे. ज्यात सचिन शिंदे हा पुण्यातील पोलिस अधिकारी अडकला आहे. ३५ हजारांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने सचिन शिंदेला अटक केले आहे. दिवसेंदिवस राज्यात लाच घेण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा