बदलापूर मधे गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी केल्याचा प्रकार; बदलापूर होतोय गुन्हेगारीचा अड्डा, नागरिक संतप्त

SHARE:

मुंबई – बदलापूर मधे गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी केल्याचा प्रकार घडला आहे. गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी केल्याचा प्रकार घडल्यामूळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. बदलापुरातील धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. बदलापूर पोलिसांना महिलेच्या घरात संशयास्पद इंजेक्शन सापडले आहेत. बदलापूरमध्ये मानवी तस्करीचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले आहेत. बदलापूरमधील या प्रकरणाने बदलापूरमधील नागरिकांसह पोलीस यंत्रणेलाही धक्का बसला आहे.

बदलापूरमध्ये अंडाशयाच्या तस्करीचं रॅकेट पकडले आहे. बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याची घटना घडली आहे. बदलापूर पोलिसांनी एका दलाली करणार्या टोळीला पकडले आहे. त्यात ३ महिला सहभागी आहेत. त्यांच्या या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्या आहेत याचा बदलापूर पोलिस तपास करत आहेत. बदलापूरमधील एका पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली आहे. बदलापूर पोलिसांनी तपास केल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा ३  महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या या ३  महिलांना २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथे सुलक्षणा गाडेकर ही महिला राहत असून, तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते.

बदलापूरमधील गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून ती हे इंजेक्शन गरिब महिलांना देत होती. तसेच कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करत होती. महिलांच्या गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर, अशा महिलांना गाडेकर नावाची महिला आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवत होती. तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढले जात होते. या बदलापूर प्रकरणात महिलांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या या अंडाशयाची बेकायदेशीर विक्री करण्यात येत होती.

बदलापूर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणात सुलक्षणा गाडेकर या महिलेसह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे या तीन महिलांना अटक करण्यात आले आहे. बदलापूर पोलिसांनी गाडेकर या महिलेच्या घरी धाड टाकली होती. त्यात गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रे, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. आता या बदलापूर तस्करीमध्ये प्रकरणात आणखी कोण सामील आहे याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणात अधिक तपास बदलापूर पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा