दुर्ग – केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आरएसएसची संलग्न संघटना बजरंग दलाचा देशभरात तांडव सुरू आहे. कुठे जरबरण माहरण केली जात आहे आणि जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले जात आहे, तर कुठे अनु. जातीच्या लोकांना शेण खाण्यास भाग पाडले जात आहे. या दरम्यान महाशिवरात्री यात्रेत एका मस्लिम व्यापर्याशी शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. यात्रेत मुस्लीम व्यापार्याला व्यापार करण्यापासून रोखले आणि शिवीगाळ केली. या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दुर्ग जिल्ह्यातील देवबालोदा-चरोडा येथे घडली.
१६ फेब्रुवारी रोजी देवबालोदा-चरोडा येथे आयोजित महाशिवरात्रीच्या यात्रेत एका मुस्लिम व्यापाऱ्यावर खोट्या बहाण्याने दुकान सुरू केल्याचा आरोप केला. त्यानंतर मुस्लिम दुकानदाराला आधार कार्ड मागितले. यानंतर धार्मिक भाष्य करताना त्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. यावरून वाद निर्माण झाला आहे.
पोलिसांनी मोहम्मद इस्माईल यांच्या तक्रारीवरून, मुस्लिम व्यापाऱ्यांशी गैरवर्तन करणे, आक्षेपार्ह भाष्य करणे आणि त्यांना व्यवसाय करण्यापासून रोखणे या आरोपाखाली भिलाई-३ पोलीस ठाण्यात बजरंग दलाचे अधिकारी प्रदीप सिन्हा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मेळ्यात उपस्थित असलेले काही लोक दुकानदारांशी वाद घालताना आणि धर्माच्या नावाखाली दुकाने बंद करण्यास भाग पाडताना दिसत आहेत. तक्रारीत असेही म्हटले आहे की व्यापाऱ्यांना मंदिर परिसरात दुकाने न लावण्याचा आणि तेथून निघून जाण्याचा इशारा देण्यात आला होता. शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी उशिरा भारतीय दंड संहिताच्या कलम १९६, ३५१ (३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, दुर्ग जिल्ह्यातील भिलाई नगर जामा मस्जिद ट्रस्ट आणि भीम आर्मी या संघटनांनी या घटनेचा निषेध केला. त्यांनी संयुक्तपणे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले, ज्यात धार्मिक उन्माद भडकवण्याचे प्रयत्न थांबवण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.




