संभाजीनगर – पोलिस भरती प्रक्रिया सुरू असताना सांगलीच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीवेळी धावताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे, अशी माहिती संभाजीनगर पोलिसांकडून देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिस अधीक्षक कार्यालय येथे लोहमार्ग पोलिस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला आहे.
सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे हा तरुण संभजीनगरमध्ये पोलिस भरतीसाठी धावण्याची चाचणी देत होता. धावत असताना अचानक तो मैदानात खाली पडला आहे. उपस्थित पोलिस कर्मचार्यांनी त्याला उचलून जवळच्या घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृत्यूचे नेमके कारण कळाले नाही. मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे वय २३ , मूळ रा. सांगली असे आहे. माहितीनुसार, सकाळी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय येथील मैदानावर धावताना तो खाली पडला होता. संग्राम शिंदेला मदत करण्यात आली आहे, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे राज्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा अशा पध्दतीने मृत्यु होणे ,त्याच्या कुटुंबासाठी धक्कादायक बाब आहे. याप्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. देशसेवा आणि समाजसेवेचे स्वप्न मनात ठेवून पोलीस भरतीसाठी जिद्दीने तयारी करणार्या सांगलीच्या २३ वर्षीय तरुणाचा पोलिस भरती सूरू असताना मृत्यू झाला आहे. या प्रकरणात अधिक तपास संभाजीनगर पोलिस करत आहेत.




