अहिल्यानगर – शाळेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगरमध्ये शाळेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका तरूणीला फसवले आहे. तिच्यावर अत्याचार केला आहे. एका २५ वर्षीय तरुणीसोबत अत्याचार केल्याच्या प्रकरणात राज्यातील शरद पवार गटाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षावर गून्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका तरूणीला नोकरीच्या आमिषाने बोलावून अत्याचार करण्यात आले आहेत. फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अभिषेक कळमकर यांनी तिच्याशी संपर्क साधला होता.
त्यानंतर अहिल्यानगर शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या शरद पवार गटाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षाने त्या तरूणीला व्हिडिओ कॉल वरूनही त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपी वेळोवेळी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वारंवार तरुणीला त्रास देत होता. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तरूणीने तरुणीने पोलिसांत गून्हा दाखल केला आहे.
अत्याचार करताना आरोपीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. व सतत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केले आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. अहिल्यानगरमध्ये शाळेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने या तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे.
अहिल्यानगरमधील पीडित तरुणीने या संदर्भातील काही व्हिडिओ स्वरूपातील पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अहिल्यानगर शहराचे माजी महापौर आणि राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्यामुळे अहिल्यानगरमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. या घटनेने राज्यातील महिला सूरक्षिततेवर पून्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.




