नागपूरमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर फुटला

SHARE:

नागपूर – बारावीच्या परीक्षा केंद्रावर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर फुटला आहे. नागपूर मधील सेंट उर्सुला बारावीच्या परीक्षा केंद्रावर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर फुटले आहेत. एका कोचिंग क्लासेस शिक्षकाने पेपर लीक केला आहे. या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. राज्यात बारावीच्या परीक्षेत ही धक्कादायक घटना नागपुर शहरात घडली आहे. विज्ञान शाखेचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या आधीच फुटल्याने खळबळ उडाली आहे.

या कॉपी प्रकरणात नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर ही घटना उघडकीस आली आहे. केमिस्ट्रीचा पेपर सुरू असताना, एक विद्यार्थिनी वारंवार बाहेर जात होती. तिच्या या संशयास्पद हालचालींमुळे तिथल्या पर्यवेक्षकांना संशय आला. त्यांनी महिला शिक्षिकेमार्फत विद्यार्थिनीची झडती घेतली असता, तिच्याकडे एक स्मार्टफोन सापडला आहे.

विद्यार्थिनीचा जेव्हा मोबाईल तपासला गेला, तेव्हा उपस्थित सर्व घाबरले होते. लागले. त्या मोबाईलमध्ये एका व्हॉटसअप ग्रुपवर परीक्षेच्या आधीच संपूर्ण पेपर आलेला होता. नागपूर पोलीसांच्या तपासात समोर आले आहे की, मोबाईलमध्ये एकूण १५ विद्यार्थ्यांचा एक व्हाटसअप ग्रुप तयार करण्यात आला होता. कॉपी पकडल्या गेलेल्या विद्यार्थिनीची अधिक चौकशी केली असता, तिने धक्कादायक माहिती दिली आहे. नागपूर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने हा पेपर फोडला आहे.

या व्हाटसअप ग्रुपमधील इतर १३ विद्यार्थी नागपूर शहराच्या वेगवेगळ्या केंद्रांवर पेपर सोडवत होते. केंद्रप्रमुखांनी नागपूर पोलिसांना ही माहिती दिली आहे. नागपूर पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त केला आहे. तर त्या शिक्षकाचा आणि पेपर लीक झालेल्या रॅकेटचा तपास सुरू आहे. या प्रकरणाने राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील बारावीच्या बोर्डाच्या शिक्षण मंडळावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राज्यात आतापर्यत अनेक जिल्ह्यात दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत अनेक कॉपीचे गैरप्रकार झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. दिवसेंदिवस राज्यात बारावी व दहावीच्या परिक्षेत गैरप्रकार वाढत चालले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा