शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदच्या अडचणी वाढल्या, लैंगिक शोषण प्रकरणी कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

SHARE:

नवी दिल्ली – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश पॉक्सो विशेष न्यायालयाने दिले आहेत. प्रयागराज येथील पॉक्सो न्यायालयाने अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याबद्दल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश प्रयागराज पोक्सो न्यायालयाने शनिवारी दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर आता झुंसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल. शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी कलम १७३(४) अंतर्गत अर्ज दाखल करून गुन्हा नोंदवण्याची आणि कठोर कारवाईची मागणी केली होती.

प्रयागराज पोलिस आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतर पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विनोद कुमार चौरसिया यांच्या न्यायालयाने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद, त्यांचे शिष्य मुकुंदनंद आणि दोन ते तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोप करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचे जबाब 13 फेब्रुवारी रोजी न्यायालयात नोंदवण्यात आले, त्यासोबत व्हिडिओग्राफीही करण्यात आली. न्यायालयाने पोलिस अहवालाचीही दखल घेतली आणि सुनावणीनंतर न्यायालयाने 13 फेब्रुवारीपर्यंत आपला आदेश राखून ठेवला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार आता पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी म्हणाले कि आम्ही दारोदार फिरत होतो. आम्ही पोलिसांकडे जात होतो. आमचे ऐकले जात नव्हते. म्हणूनच आम्ही न्यायालयात आलो. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की शिष्यांवर लैंगिक अत्याचार झाले. त्यांनी समलैंगिक कृत्ये केली. न्यायालयाने याची पुष्टी केली आहे.
न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा हवाला देत म्हटले की प्रत्येक प्रकरणात एफआयआर दाखल करणे अनिवार्य नाही. एफआयआर दाखल करण्याचा आदेश द्यायचा की तक्रारीचा पाठपुरावा करायचा हे ठरवण्याचा अधिकार न्यायाधीशांना आहे. जर पोलिस चौकशी आवश्यक असेल तर एफआयआर दाखल करून चौकशी करणे योग्य आहे. न्यायालयाने म्हटले की आरोप गंभीर आणि दखलपात्र गुन्ह्यांच्या श्रेणीत येतात आणि पोक्सो कायदा लागू होतो. पुरावे गोळा करण्यासाठी पोलिस तपास आवश्यक आहे.

न्यायाधीशांनी संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी तात्काळ गुन्हा दाखल करून कायद्यानुसार स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास करण्याचे आदेश दिले. पॉक्सो कायद्यातील तरतुदींचे पालन केले पाहिजे. पीडितांची ओळख आणि प्रतिष्ठा जपली पाहिजे. तपास अहवाल न्यायालयात सादर केला पाहिजे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या आश्रमात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप आशुतोष ब्रह्मचारी यांनी केला आहे. त्यांनी या घटनेची सीडी न्यायालयात सादर केल्याचा दावाही केला आहे. आशुतोष ब्रह्मचारी म्हणाले की ते प्रयागराज ते वाराणसी अशी पायी यात्रा काढतील. असे करून ते सत्य जनतेसमोर आणतील. विद्या मठातच अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप आशुतोष ब्रह्मचारी यांनी केला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर शंकराचार्य म्हणाले कि लैंगिक अत्याचाराचा खटला खोटा सिद्ध होईल. हा एक बनावट खटला आहे. आशुतोष महाराज रामभद्राचार्यांचा शिष्य आहे. तो हिस्ट्रीशीटर आहे. त्याने यापूर्वीही लोकांवर खोटे खटले दाखल केले आहेत. तो लोकांना धमकावतो आणि पैसे उकळतो.

Leave a Comment

अधिक वाचा