मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ३२ तास अडकलेल्या १.२ लाख प्रवाशांना ५.१६ कोटींचा टोल परत मिळणार

SHARE:

मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ३२ तास अडकलेल्या १.२ लाख प्रवाशांना ५.१६ कोटींचा टोल परत मिळणार आहे असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हटले आहे. राज्यातील महामार्गावर ३२ तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना टोल परत मिळणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे बांधण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 3 फेब्रुवारी २०२६ रोजी या एक्स्प्रेस हायवेवर एका अपघाताने वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक ३२ तासानंतर पूर्ववत झाली होती. अनेकांना या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले होते. या वाहतूक कोंडीत हजारो प्रवासी अडकून पडले होते आणि अनेकांना पाणी, अन्न तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागला होता. मात्र आता त्या सर्व वाहतूक कोंडीत फसलेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. प्रवाशांकडून टोल वसूल केलेली रक्कम परत मिळणार आहे. राज्यातील १.२ लाख प्रवाशांना सुमारे ५.६ कोटींचा टोल परतावा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत टोल वसूल केलेली रक्कम परत देण्यात येणार आहे. काही दिवसांत वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशी व संबंधित वाहनचालकांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. पुणे-मुंबई महामार्गावर अपघातानंतर प्रशासनाने तातडीने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र तोपर्यंत काही वाहनधारकांच्या खात्यांतून टोलची रक्कम वजा झाली होती. याच व्यवहारांची माहिती तपासून आता ती रक्कम परत करण्याचा निर्णय राज्यातील रस्ते विकास खात्याकडून घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वाहनधारकांकडून टोल वसूल झाला आहे, त्या सर्वांना पूर्ण परतावा दिला जाणार आहे. राज्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तसेच पुणे-बंगळुरू महामार्ग या मार्गांवरील टोल घेतलेल्या प्रवाशांचा व वाहनधारकांचा समावेश असणार आहे. टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून सर्व व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला आहे. रस्ते विकास अधिकाऱ्यांनी सांगितले की, महामार्गावरील टोल नाक्यांवरील बॅरिअर्स पूर्णपणे उघडण्यापूर्वी काही व्यवहार प्रक्रिया झाली असण्याची शक्यता आहे.

अशा सर्व व्यवहारांचा डेटा तपासून संबंधित वाहतूक कोंडीतील प्रवाशांना पैसे परत दिले जाणार आहेत. राज्यात ३२ तासांची वाहतूक कोंडीची घटना झाल्यानंतर टोल परताव्याची मागणी जोर धरत होती. ३२ तास वाहतूक कोंडीत सापडलेल्या १.२ लाख प्रवाशांना ५ कोटींहून अधिक रक्कम परत मिळणार आहे, त्यामूळे प्रवाशी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा