यूपीत पाच वर्षांत सात विमानतळे सुरू, आता सहा विमानतळांवर उड्डाणे बंद, आरटीआयमध्ये खुलासा

SHARE:

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात २०२१ नंतर सात विमानतळांवर व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली, परंतु आता या सातपैकी सहा विमानतळांवरील नियमित उड्डाणे बंद झाली आहेत. या सातपैकी सध्या फक्त अयोध्या विमानतळावरच उड्डाणे सुरू आहेत. माहितीच्या अधिकारातून हा खुलासा झाला आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या कुशीनगर विभागाने माहितीच्या अधिकरात दिलेल्या उत्तरानुसार, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन २० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले होते. यानंतर या विमानतळावरून २६ नोव्हेंबर २०२१ रोजी उड्डाणे सुरू झाली. मात्र नोव्हेंबर नोव्हेंबर २०२३ पासून या विमानतळावरील उड्डाणे बंद झाली आहेत.

आझमगड विमानतळाचे १० मार्च २०२४ रोजी उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावरून ११ मार्च 2024 रोजी उड्डाणे सुरू झाली. मात्र नोव्हेंबर २०२४ पासून या विमानतळावरील उड्डाणे बंद आहेत. याशिवाय अलिगड विमानतळाचे १० मार्च २०२४ रोजी उद्घाटन झाल्यानंतर ११ मार्च २०२४ रोजी या विमानतळावरून उड्डाणे सुरू झाली. मात्र आता हे विमानतळ बंद आहे.
अशीच स्थिती चित्रकूट आणि श्रावस्ती विमानतळाची आहे.

चित्रकूट विमानतळाचे १० मार्च २०२४ उद्घाटन झाल्यानंतर येथून ११ मार्च २०२४ रोजी उड्डाणे सुरू झाली. परंतू आता डिसेंबर २०२४ पासून या विमानतळावरून उड्डाणे बंद झाली आहेत. तर श्रावस्ती विमानतळाचे १० मार्च २०२४ रोजी उद्घाटन झाल्यानंतर याच दिवसांपासून या विमानतळावरील उड्डाणे बंद आहे.
तसेच मुरादाबाद विमानतळाचे उद्घाटन १० मार्च २०२४ रोजी झाले. यानंतर १० ऑगस्ट २०२४ रोजी या विमानतळावरून उड्डाणे सुरू झाली. मात्र नोव्हेंबर २०२४ पासून बंद हे विमानतळ बंद आहे. सात विमानतळांपैकी सध्या फक्त अयोध्या येथे नियमित उड्डाणे सुरू आहेत.

कुशीनगर विमानतळ दोन वर्षे चालले. परंतु नोव्हेंबर २०२३ मध्ये तेथे उड्डाणे बंद झाली. मार्च २०२४ मध्ये उघडलेले इतर विमानतळ काही महिन्यांतच बंद झाले. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन मोठ्या ठाटामाटात ऑक्टोबर २०२१ मध्ये झाले आणि पुढच्या महिन्यात नियमित उड्डाणे सुरू झाली. मार्च २०२२ पर्यंत ५४ नियोजित उड्डाणे सुरू होती. परंतु २०२३ पर्यंत चित्र बदलले. उड्डाणांमध्ये घट होत राहिली आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये सेवा बंद पडल्यानंतर फक्त सहा उड्डाणे उरली. २०२१ नंतर उघडलेल्या सात विमानतळांपैकी सहा विमानतळांनी नियमित उड्डाणे बंद केली आहेत. याचा अर्थ असा की नवीन लाँचिंग चांगल्या पायांभूत सुविधांमुळे टिकून राहण्यात अपयशी ठरले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा