आरएसएसच्या विरोधात विशाल महामोर्चा, अनेक संघटनाचे लाखो कार्यकर्ते एकवटले; नागपूर नगरीत आगळ्या वेगळ्या आंदोलनाने वेधले सर्वांचे लक्ष

SHARE:

नागपूर – आरएसएसच्या विरोधात विशाल महामोर्चा काढण्यात आला. इंदौरा मैदानातून या मोर्चाची सूरूवात झाली. नागपूर मधील आरएसएस मूख्यालयावर काढण्यात आलेल्या विशाल महामोर्चाचे वामन मेश्राम व चौधरी विकास पटेल यांनी नेतृत्व केले. नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर देशातील विविध सामाजिक, धार्मिक संघटनाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी भारत मुक्ती मोर्चा, बहूजन क्रांती मोर्चा, मूलनिवासी महिला संघ, या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यानी लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.

या दरम्यान मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यानी आरएसएस व भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मूलनिवासीयोंका नारा है, भारत देश हमारा हैं, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी हैं, डीएनए रिपोर्ट काय म्हणते, बामन विदेशी हाय म्हणते, मूलनिवासीयोंका नारा हैं, भारत देश हमारा हैं, ईव्हीएम की जो सत्ता हैं वह लोकतंत्र की हत्या हैं, ये सरकार, वो सरकार, दलाल भडवोंकी सरकार, आरएसएस बीजेपीने क्या किया, देश का सत्यानाश किया, निकलो बाहर मकानोंसे, जंग लढो बेईमानोंसे, ईव्हीएम हटाव, देश बचाव, आर्टीकल १९ का हनन बंद करो, महिलांवरील अत्याचार बंद करा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, ईव्हीएम से वोट घोटाला नहीं चलेगा, विदेशी ब्राम्हण भारत छोडो, गली गली में शोर है, चूनाव आयोग चोर हैं, सबसे बडा आतंकवादी, ब्राम्हणवादी ब्राम्हणवादी, ब्राम्हणवाद ने क्या किया, देश का सत्यानाश किया, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

राष्ट्रीय सीख मोर्चाचे कार्यकर्ते ही या विशाल महारॅलीला उपस्थित होते. यातील एका कार्यकर्त्याने सांगितले की, सर्वाना बरोबरीचा अधिकार मिळाला पाहिजे, कोणावरही अन्याय होता कामा नये. देशातील मूसलमानांची मॉब लिचिंग थांबली पाहिजे, मनूवादी लोकांच्या रीतीरिवाज व प्रथामूळे देशात ब्राम्हणवाद वाढत आहे. आज अजूनही या देशात काही प्रथा जीवंत आहेत, याचा अर्थ ब्राम्हणवाद जीवंत आहे.

ते पुढे म्हणाले की, या देशातील ब्राम्हणवादी लोक नरेंन्द्र मोदी व अमित शहाला पुढे करून देशात जातीयवाद वाढवत आहे. हिंदूत्वाच्या नावावर ओबीसी, एससी, एसटी, आणि मायनॉरिटीच्या लोकांवर अन्याय ,अत्याचार करत आहेत. आरएसएस व बीजेपीचे लोक मोदी-शहाच्या नावावर ब्राम्हणवाद जीवंत ठेवत आहेत. हिंदूत्वाच्या नावावर जातीजातीत भांडणे लावण्याचे काम करत आहे. आज देशात ब्राम्हणवादाच्या नावावर एसी,एसटी, ओबीसी यांच्यावर अन्याय होत आहे. मोहन भागवत हा आरएसएसच्या नावावर देशात ब्राम्हणवाद वाढवण्याचे काम करत आहे. आजही आरएसएसच्या इशार्यावर भारतात हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राम्हणवाद जोपासला जात आहे. आता आम्ही ब्राम्हणवाद पसरवणार्यांना सोडणार नाही. बीजेपी व आरएसएसचे जे लोक चुकीचे काम करत आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले की, आता देशातील ओबीसी एससी एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. आम्ही आमच्या मागण्या व हक्क आणि अधिकारांसाठी आरएसएसच्या मुख्यालयावर महामोर्चा काढला आहे. मागच्या वेळेस या मोर्चासाठी नागपूरात ५ लाख लोक आले होते. आता या मोर्चासाठी संपुर्ण देशभरातून १० लाख लोक येणार आहेत. देशभरातून सामाजिक, धार्मिक संघटनाचे नेते, कार्यकर्ते आरएसएस मुख्यालयावर महामोर्चासाठी आले आहेत.

भारतात दरवेळी भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ संघटनाचे राष्ट्रीय अधिवेशन होत असते. यावेळेस ओडिसा राज्यातील कटक येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनांनी सर्व कार्यक्रमाच्या कायदेशीर परवानग्या घेतल्या होत्या. मात्र, कटक प्रशासनाने आरएसएस व बीजेपी सरकारच्या दबावामूळे राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी अचानक रद्द केल्यामूळे अधिवेशन होऊ शकले नाही. भारतीय संविधानाने आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आमच्या संविधानातील हक्क व अधिकारांसाठी नागपूरात आरएसएस मुख्यालयावर या विशाल मोर्चासाठी आलो आहोत. आम्हाला संविधानाने मोर्चा काढण्याचा व आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. या देशात आमच्या संवैधानिक हक्क व अधिकारांचे उल्लंघन होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रीय सिख मोर्चाच्या पदाधिकार्यांने दिला.

उत्तरप्रदेशातील मिर्जापूरचे भारत मूक्ती मोर्चा कार्यकर्ते म्हणाले की, आमच्या मौलिक अधिकाराचे आरएसएस भाजपा सरकारने हनन केले आहे. २ महिन्यांपूर्वी राष्ट्रीय अधिवेशन ओरिसा येथे करण्यासाठी परवानगी मिळाली होती, परंतू अचानक ओडिसा सरकारने अधिवेशनाची परवानगी नाकारली आहे. आम्ही सर्व कायदेशीर परवानगी घेऊनच देशभरात कार्यक्रम आयोजित करत असतो. आमच्या संघटनेने सर्व परवानगी घेतली असताना ही ओडिसा सरकारने आरएसएस व भाजपा सरकारच्या दबावाखाली अधिवेशनाची परवानगी रद्द केली आहे.

ते पुढे म्हणाले की, या अधिवेशनासाठी करोडो रूपये खर्च करून तयारी करण्यात आली होती. त्यामूळे नागपुर येथे आज आरएसएस मूख्यालयाला घेराव घालण्यासाठी भारतातील ३१ राज्यांमधून, ७०० जिल्ह्यांमधून, ६,००० गावांमधून लोक येणार आहेत. आमच्या अधिवेशनाला रोखण्याचे काम आरएसएस प्रणित बीजेपी सरकारने केले आहे. नागपूर येथील इंदौरा मैदानात उत्तरप्रदेशातील आजमगड, मेरठ, मिर्जापूर, येथून लोक आले आहेत, असे भारत मुक्ती मोर्चाचे मिर्जापूर येथील पदाधिकारी म्हणाले.

यवतमाळमधील एक कार्यकर्ता म्हणाला की, ओडिसा राज्यातील कटक येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. आरएसएस व भाजपाच्या दबावामूळे ओडिसा राज्यसरकारने अचानक अधिवेशन थांबवले आहे. त्यामूळे हा नागपूर मध्ये आरएसएसच्या विरोधात मोर्चा काढला आहे. ओबीसी जातीय जनगणनेवर अधिवेशनात चर्चा होणार होती. त्यामूळें या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लोक नागपूर येथे आलो आहोत. याच इंदौरा मैदानावर येथून मागे ही देशभक्ती व संविधान बचाव मोर्चा निघाले आहेत, तर आजचा हा मोर्चा आमच्या हक्क व अधिकार वाचवण्यासाठी आहे. तर भारतीय संविधान वाचवण्यासाठी आम्ही येथे मोर्चासाठी आलो आहोत. असे पिछडा वर्ग मोर्चाच्या पदाधिकार्यांनी सांगितले.

मध्यप्रदेशातील बैतूलचे एक कार्यकर्ते म्हणाले की, जेव्हा देशात अराजकता वाढते तेव्हा देशातील तरूण पिढी जागृत होऊन आंदोलनात सामील होते. येथून पुढे ही जबाबदारी तरूण पिढीची आहे. आजही तरूण पिढी आंदोलनात येत आहे. आज नागपूरमध्ये आरएसएसच्या विरोधात यूवा पिढी मोर्चासाठी आली आहे. एससी, एसटीचे हक्क व अधिकार संपविण्याची परिस्थिती येत असेल तर आम्ही तरूण पिढी पुढे येईल. बहुजन महापूरूषांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. या देशात फुले-शाहू-आंबेडकर-कांशीराम या महामानवांनी बहुजन समाजासाठी लढाई लढली आहे. स्वतंत्रता, समता, बंधूता, न्याय या तत्वावर काम करणारे आमचे महापूरूष होते. त्याच मार्गाने आम्ही काम करत आहोत. आमच्या हक्क व अधिकाराला वाचविण्यासाठी आम्ही या महामोर्चाला आलो आहोत. या देशात बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटना देशभरात महापूरूषांच्या विचारांसाठी दिवसरात्र काम करत आहेत. या संघटना देशपातळीवर सर्व गावपातळीवर, शहरी भागात, एससी, एसटी, ओबीसी, आणि मायनॉरिटीच्या लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून काम करत आहेत. आम्ही ओबीसी एससी, एसटीचे सर्व लोक मध्यप्रदेशातून येथे नागपूरला मोर्चासाठी आलो आहोत असे ते म्हणाले.

पंजाब सिख मोर्चाचे के एफ खालसा म्हणाले की, ओडिसा राज्यातील कटक येथे २००८ साली पहिले एक अधिवेशन झाले आहे. आताही २०२५ डिसेंबर मध्ये राष्ट्रीय अधिवेशन होणार होते. भाजपा व आरएसएसच्या दबावामूळे ओडिसा सरकारने अधिवेशनाची परवानगी अचानक २४ तास आधी रद्द केली आहे. यामूळे वामन मेश्राम यांनी ४ चरणात आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानूसार आज ४ थ्या चरणातील आंदोलन हे नागपूरच्या आरएसएस मूख्यालयाला घेराव घालण्यासाठी व आरएसएस व बीजेपी सरकारला इशारा देण्यासाठी होत आहे. यापुर्वी ही आरएसएसच्या मूख्यालयावर भारत मूक्ती मोर्चा या सामाजिक संघटनने मोठा मोर्चा काढला होता. आजच्या या मोर्चासाठी देशसभरातून १० लाख लोक येणार आहेत.

आजही आरएसएस व भाजपा सरकार या देशात जातीजातीत भांडणे लावत आहेत. ओबीसी, एससी, एसटी या बहूजन समाजाला त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवत आहे. शीख, मूसलमान, बौध्द या लोकांच्यात आपापसांत भांडणे लावत आहेत. आरएसएस व भाजपा हिंदुराष्ट्राच्या नावावर देशभरात ओबीसी, एससी, एसटी यांच्यामध्ये वाद उभा करत आहे. देशातील बहूजन समाजाच्या अधिकारांचे उल्लंघन करत आहे. युजीसीच्या विषयावरून देशात मोठा वाद उभा केला आहे. हिंदूराष्ट्राच्या नावावर देशातील तरूणांची माथी भडकवण्याचे काम आरएसएस-भाजपा करत आहे. म्हणून आज हा नागपूर येथे आरएसएस मूख्यालयावर विशाल महामोर्चा काढला आहे. देशातील भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व देशातील ओबीसी, एससी, एसटी सर्व बहुजन समाजाचे लोक या मोर्चात आले आहेत. देशातील २०० सामाजिक संघटनांनी या मोर्चासाठी समर्थन दिले आहे, असे पंजाब सिख मोर्चाचे के एफ खालसा म्हणाले.

उत्तरप्रदेश मूलनिवासी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या म्हणाल्या की, ओडिसा येथे भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ संघटनेचे कटक येथे अधिवेशन होणार होते. परंतू आरएसएस भाजपा सरकारने ओडिसा येथे अधिवेशन होऊ दिले नाही. संविधानातील हक्क व अधिकरावर आरएसएस व बीजेपी सरकार गदा आणून आमच्या संवैधानिक हक्क आणि अधिकाराचे उल्लंघन करत आहे. या देशात अधिवेशन थांबवून या आरएसएस प्रणित भाजपा सरकारने गैरसंविधानिक काम केले आहे.

राष्ट्रीय अधिवेशनाच्या सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या होत्या. व या अधिवेशनासाठी करोडा रूपये खर्च केले होते. तरीही हे अधिवेशन ओडिसा सरकारने होऊ दिले नाही. आरएसएस प्रणित भाजपा सरकार आमच्या हक्क व अधिकाराचे उल्लंघन करत आहे. त्यामूळे चौथ्या चरणातील आंदोलन हे नागपूर येथे होत आहे. नागपूर मधील आरएसएसच्या मूख्यालयाला घेराव घालण्यासाठी तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक या राज्यातील मूलनिवासी असलेल्या ओबीसी ,एससी, एसटी समाजाचे लोक व मूलनिवासी महिला कार्यकर्त्या या विशाल महामोर्चासाठी उपस्थित झाल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment

अधिक वाचा