चेन्नईच्या गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील विद्यार्थांचा समुद्रात बुडून मृत्यू; समुद्राच्या किनाऱ्यावर ग्रुप सेल्फी घेत असतांना घडली घटना

SHARE:

चेन्नई – चेन्नईच्या गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील विद्यार्थांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. समुद्र शांत असताना मोठ्या लाटा उसळल्या आहेत. चेन्नईच्या गोल्डन बीचवर मोठी दुर्घटना घडली आहे. राज्य सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समुद्रात 15 फुटांच्या लाटा उसळल्या यावेळी काही विद्यार्थी पाण्यात बुडाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तसेच बचाव पथकांनी तात्काळ मदत कार्य सुरु केले.

काही विर्द्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची माहिती दिली आहे. चैन्नई येथे महाराष्ट्रातील 15 मुले एका आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी आली होती. काल सुट्टी असल्याने ही सर्व मुले चेन्नई येथे कांथाट्टूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बीचवर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. त्याठिकाणी समुद्रात 10 ते 15 फुटांच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. या मुलांचा सर्व ग्रुप सेल्फी घेत असताना मोठ्या लाटेत वाहून गेला आहे.

काही मुले समुद्रात वाहून गेली आहेत. काहींचे मृतदेह सापडले आहेत. त्यात 3 मुलांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसरकारने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत या दुर्घटनेची माहिती दिली आहे. चेन्नई तामिळनाडू येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यासोबत समुद्राच्या पाण्यात उतरतल्यावर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी समुद्रात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला आहे. महाराष्ट्र राज्य सरकार व तामिळनाडू सरकार मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहेत. तामिळनाडू शासनाच्या माहितीनुसार, 26 विद्यार्थ्यांपैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही.

राज केदारी हे सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यातून बाहेर आले आहेत. जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले आहेत. मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी शोक व्यक्त केला आहे. तसेच, तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्यात मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा