नागपूर – महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे, तर कोकण व विदर्भात अवकाळी पावसाचा शेतीला फटका बसणार आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाने नागपूर, भंडाऱा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. कोकण आणि विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. भंडाऱा जिल्ह्यात ही विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे.
राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडला आहे. राज्यातील नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामूळे विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काल नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आहे. यावेळी जोरदार वार्यामूळे काही भागांमध्ये झाडे पडली आहेत.
तर नागपूरच्या मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला आहे. तर दुसरीकडे काल भंडाऱा जिल्ह्यात ही विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. भंडाऱ्यात 5 वाजतापासून विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. कालच्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेली चना, तुर, मुग, उडीद यासारखी कडधान्याची पिके आणि शेती भाजीपाला पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तर, काही ठिकाणी उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. राज्यातील हवामान विभागाने २३ आणि २४ फेब्रुवारी २०२६ या २ दिवसात विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे, असे सांगितले आहे. तर त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गोंदिया जिल्ह्यात ही आज सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात सह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे फायदा होऊ शकतो. तर कडधान्य पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ही रविवारी अवकाळी पाऊस झाला आहे. रत्नागिरीच्या काही भागात जोरदार वार्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे येथील आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
सध्या आंब्याच्या झाडांना मोहोर आला आहे. काही ठिकाणी झाडांना फळे लागली आहेत. मात्र, कालचा वारा आणि जोरदार पावसामुळे मोहोर आणि ही फळे गळून पडली आहेत. त्यामुळे कोकणात अवकाळी पावसामूळे आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात वाढलेल्या उकाड्यानंतर लातूर शहर व परिसरात मोठा पाऊस पडला आहे. मध्यरात्री ३ वाजता शहरातील काही भागांत अवकाळी पाऊस पडला आहे.
त्यानंतर आज सकाळी ६ ते ७ वाजेपर्यत लातूरमधील राजीव गांधी चौक, उद्योग भवन, गरुड चौक या परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. काल मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत लातूर शहराच्या विविध भागांत पाऊस पडला आहे. अचानक पाऊस पडल्याने काही काळासाठी रस्त्यांवर पाणी साचले होते. राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे, असे राज्यातील हवामान विभागाने सांगितले आहे.




