परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन होणार; शक्तिपीठ महामार्ग जमीन मोजणीला तात्पुर्ती स्थगिती

SHARE:

परभणी – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग जमीन मोजणीला स्थगिती देण्यात आली आहे. परभणीत आज रास्ता रोको आंदोलन होणार आहे. प्रशासनाच्या विरोधात शेतकरी बांधवांकडून निषेध मोर्चा काढला जाणार आहे. परभणीत शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी सुरू असलेली जमीन मोजणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आहे. परभणीत शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी सुरू असलेली जमीन मोजणी थांबवली असली तरी शेतकरी व विविध पक्ष-संघटनांनी जाहीर केलेली आंदोलने नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे.

प्रशासनाच्या निर्णयानंतरही आंदोलन मागे घेण्यात आलेले नाही. आज परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन होणार आहे. आंदोलन एकत्र करण्याचा निर्णय परभणीतील विविध राजकीय पक्षांनी घेतला आहे. पूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होणार होते. परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ बाधित शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा व इतर संघटनांचा पोखरणी येथे रस्ता रोको करण्याचा निर्णय होता. तर उबाठा सेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिंगणापूर येथे आंदोलन होणार होते.

मात्र दोन ठिकाणी आंदोलन करण्याऐवजी आता परभणी जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येऊन शिंगणापूर फाट्यावर सर्वपक्षीय रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यभर आंदोलन होणार आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला आहे.

विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत आज मोर्चे, धरणे, निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलने करण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी भाजपा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शक्तिपीठ महामार्गावरून अनेक नेत्यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्ग प्रकल्पात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. भाजपा सरकारला हा प्रकल्प रद्द करावा लागेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातील कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा मार्ग घाईघाईने बनवायचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा