अमरावती जिल्ह्यात मोठा अपघात 4 जणांचा मृत्यू; 10 ते 12 लोक गंभीर जखमी

SHARE:

अमरावती – जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे, त्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, या अपघातात ७  ते ८  व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. तर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन ६० ते ७०  फूट खोल दरीत पडले आहे. अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४  जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात ही अपघाताची घटना घडली आहे. राणीगावच्या घाटामध्ये पिकअप वाहन पलटी झाल्यामूळे 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत.

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रिव्हर्समध्ये बाजूच्या ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रिव्हर्स मध्ये बाजूच्या ६० ते ७०  फूट खोल दरीत पडले आहे. धारणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ३५ किलो मीटर अंतरावर राणीगावकडे जाताना शिवाझरी ते राणीगाव प्रवास करत असताना बोलेरो पिकअप वाहनाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे.

वाहनात कंजोली आणि राणीगाव येथील १५ ते २० लोक होते. यापैकी घटनास्थळावरच 4 जणांचा मृत्यू झाला असून, ७ ते ८ व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत. सर्व मृत व्यक्ती या कंजोली ता. धारणी येथील आहेत. हे लोक बाजाराकरिता देडतलाई मध्यप्रदेश येथे गेले होते. सर्व मृतदेह आणि जखमींना उपचाराकरिता धारणी येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे. वाहनचालक पळून गेला आहे. या अपघात प्रकरणात अमरावती पोलिस तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा