वृध्द दांम्पत्याची २ कोटीहून अधिक रूपयांची फसवणूक; सुप्रीम कोर्ट च्या नावाने फसविल्याचा आरोप

SHARE:

पुणे – पुण्यात वृध्द दांम्पत्याची २ कोटीहून अधिक रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यात एका वृद्ध जोडप्याला २२ दिवस कॉल करून भीती दाखवून फसवले आहे. पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील ७० वर्षीय ज्येष्ठ पती-पत्नीला एक कॉल आला होता. त्यानंतर त्या वृध्द जोडप्याला २२ दिवस दहशतीखाली ठेवले गेले होते. सुप्रीम कोर्टाची केस असून अटक होण्याची भीती दाखवत त्या वृद्ध पती-पत्नीची आयुष्यभराची कमाई लुटली आहे.

पुण्यातील एरंडवणे परिसरातील ७० वर्षीय ज्येष्ठ पती-पत्नीला १३ जानेवारी २०२६ ला एक कॉल आला होता. ज्यानंतर त्यांच्या आयुष्यात भीती निर्माण केली आहे. त्या फोन करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना सांगितले की, पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऑफ इंडियामधून राहुल रॉय बोलत आहे. राहुल रॉय या व्यक्तीने त्यांना पुढे सांगितले की, तुमच्या आधार कार्डचा वापर चुकीच्या कामासाठी झाला आहे. मनी लाँड्रिंगसोबत अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

हे ऐकून वृ्द्ध दाम्पत्य घाबरले होते. पुढे त्यांना सांगण्यात आले की, तुमचे नाव पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या प्रतिबंधित संघटनेशी जोडले गेले आहे. दीड कोटींचा फ्रॉड झाल्याची सायबर केस तुमच्या नावावर आहे. पुण्यातील त्या वृद्ध पती-पत्नीला खूप घाबरवले होते. त्यांना सांगण्यात आले की, ही सुप्रीम कोर्टाची अत्यंत गोपनीय केस आहे. त्यामुळे तुम्ही कोणाशीही बोललात तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल. या धमकीनंतर ते पती-पत्नी अतिशय घाबरले होते.

त्यानंतर पुढील २२ दिवसांमध्ये त्या चोरट्यांनी ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध बँक खात्यांवर एकूण २ कोटी १ लाख ९० हजार रुपये लुटले आहेत. ही संपूर्ण रक्कम त्यांची आयुष्यभराची कमवलेली रक्कम होती. खात्यातील सर्व पैसा गायब झाल्यानंतर त्या पुण्यातील वृध्द दांम्पत्याला कळाले की आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सायबर पोलिसांकडे धाव घेत झालेला प्रकार सांगितला आहे. या प्रकरणात पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा