हिंजवडी हद्दीत रस्त्याच्या कडेला शेतात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

SHARE:

पुणे – हिंजवडी हद्दीत रस्त्याच्या कडेला शेतात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी हद्दीत रस्त्याच्या कडेलाच शेतात ७७ वर्षीय व्यक्तीला शेतात अफूची लागवड केल्याप्रकरणात अटक करण्यात आले आहे. पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबे गावात एका ७७ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी याप्रकरणत कडक कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित वृद्ध शेतकऱ्याला अटक केली आहे. संपत बाबूराव दर्शिले वय ७७, रा. रसिकवाडी, जांबे, पुणे असे अटक करण्यात आलेल्या शेतकर्याचे नाव आहे. संपत दर्शिले यांचे जांबे गावातील रसिकवाडी रस्त्याच्या कडेला शालीमकर स्पोटर्स एरिना शेजारी शेती आहे. या शेतात त्यांनी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना अंमली पदार्थ असलेल्या अफूच्या झाडांची लागवड केली होती. हिंजवडी पोलिसांना या बेकायदेशीर शेतीबाबत माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे हिंजवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम जगदाळे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शेतात धाड टाकली होती. हिंजवडी पोलिसांनी केलेल्या या कडक कारवाईत शेतातून १६ किलो ८१०  ग्रॅम वजनाची अफूची हिरवीगार झाडे जप्त करण्यात आली आहेत. बाजारात या झाडांची किंमत मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. विनापरवाना अफूची लागवड करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरी हिंजवडी पोलिसांनी सर्व माल जप्त करून शेतकऱ्याला अटक केले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात अशा प्रकारे अफूची लागवड केल्याने हिंजवडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अफू नेमका कोणाला विकला जाणार होता, याचा हिंजवडी पोलीस तपास करत आहेत. एकीकडे राज्यात दिवसेंदिवस गून्हेगारी वाढत आहे, तर राज्यातील काही जिल्ह्यात जास्त पैसे मिळवण्याच्या नादात शेतकरी बांधव स्वःता गून्हेगारीत अडकत चालला आहे. पुणे जिल्ह्यातील हिंजवडीच्या ग्रामीण भागात शेतकर्याने स्वःताच्या शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा