अक्षय मुदवाडकर यांनी अनुभवलेला भावनिक क्षण.. ” मला लहान मुलं स्वामी आजोबा म्हणत जवळ येतात…”

SHARE:

मनोरंजन विश्व : प्रेक्षकांच्या जीवनात प्रेरणा, दिशा आणि श्रद्धास्थान अलेल्या ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर यांनी अनुभवलेला भावनिक क्षण

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका फक्त एका मालिका नाही तर भावना आहे. मालिकेचा प्रत्येक एपिसोड काही तरी उत्तम सांगणारा असतो… भक्तीरसात बुडालेल्या या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी मालिकेचे १  हजार ७०० हून अधिक एपिसोड पूर्ण झाले. सोशल मीडियावर देखील स्वामींचे अनेक एपिसोड प्रदर्शित होत असतात. पण आता स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुदवाडकर यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्यांनी स्वामींची भूमिका साकारण्याची संधी कशी मिळाली…. भूमिका साकारताना आलेला अनुभव आणि लहान मुलांकडून मिळालेली नवीन ओळख म्हणजे स्वामी आजोबा… यावर त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

अक्षय मुदवाडकर म्हणाले, ‘पूर्वीता अक्षय आणि आजत अक्षय यामध्ये फार मोठा फरक आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मी नोकरी करायचो… पण मला नाटकाची प्रचंड आवड होती. त्यामुळे मी नोकरी करून नाटक करायचो… सुरुवातीला मी काही मालिका केल्या. पण एक दिवस संध्याकाळी मला फोन आला आणि समोरुन मला विचारण्यात आलं, आम्ही स्वामींची मालिका करत आहोत, तुम्ही स्वामींची भूमिका करणार का? तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला… ज्यांना लहानपणापासून पाहत आलोय, त्यांची भूमिका करणं माझ्यासाठी मोठा अनुभव होता..’

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सांगायचं झालं तर, मालिकेत स्वामींची भूमिका साकारल्यानंतर आजही अक्षय मुदवाडकर यांच्या लोकं पाया पडतात. ‘रोज मी अनेक लोकांना भेटतो आणि रोज वेगवेगळे अनुभव मला येत असतात… मालिकेचा ५० टक्के प्रेक्षक वर्ग ५ – १० वयोगटातील मुलं आहेत. एवढंच नाही तर, मी दिसलो की, लहान मुलं स्वामी आजोबा… स्वामी आजोबा म्हणत माझ्या जवळ येतात… लोकं मला भेटतात तेव्हा माझ्या पाया पडतात…’, असं देखील अक्षय मुदवाडकर म्हणाले.

‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेक प्रेक्षकांच्या जीवनात प्रेरणा, दिशा आणि श्रद्धास्थान बनली आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना मालिका आवडते

Leave a Comment

अधिक वाचा