मुंबई – बदलापूर येथील स्त्री बीज बेकायदेशीर विक्री प्रकरणाचे राज्याबाहेर कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणात एकाच महिलेचा अनेकदा डोनर म्हणून वापर करण्यात आला आहे. पोलीस तपासात ही माहिती उघड झाली आहे. बदलापुरातील स्त्री बीज बेकायदेशीर विक्री प्रकारणाचे कनेक्शन हे राज्याबाहेर असल्याचे पोलिस तपासात आता समोर आले आहे. सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे या महिलांना या प्रकरणात अटक केले आहे.
यांची पोलीस कोठडीत पोलिसांकडून तीनही महिलांची चौकशी केली आहे. डॉक्टर, हॉस्पिटल आणि आयव्हीएफ व एआरटी सेंटरसोबत कनेक्शन आहे का? हे समोर येणार आहे. शिवाय या टोळीने महिलांचे बनावट आधार कार्ड तयार केले होते. एकाच महिलेचे वेगवेगळे नाव वापरून तिला अनेकदा डोनर बनवले आहे. या टोळीतील आरोपींनी आपल्या इतर टोळीच्या सदस्यांच्या मदतीने महिलांचे बनावट सत्यप्रतिज्ञा पत्र, आधार कार्ड, इतर बनावट कागदपत्रे तयार केली होती.
तर आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो, महिलांचे खोटे आधारकार्ड तयार करून डोनर बनवत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. बदलापूर पोलीस या प्रकरणाचीचौकशी करत आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये बनावट कागदपत्रांचे फोटो सापडले आहेत. या प्रकरणात या आरोपींच्या मोबाईलमध्ये असंख्य महिलांचे फोटो, इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी करतानाचे फोटो, बनावट कागदपत्रांचे फोटो, आर्थिक व्यवहाराचे फोटो मिळून आले आहेत.
५०० किंवा त्यापेक्षा अधिक महिलांचा यासाठी वापर करण्याचा आला आहे. डोनर महिलांना २५ ते ३० हजार रुपये दिले जात होते, तर आरोपी यात गोरगरिब असलेल्या व गरजू महिलांना हेरून स्त्री बिजाची विक्री करत होते. या टोळीतील सदस्य विविध कामात सक्रिय होते पोलिसांची ३ पथके या प्रकरणात तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखीन नवी माहिती उघड होणार आहे. या प्रकरणात घरातूनच बेकायदेशीर प्रकार सूरू होता.
माहितीनुसार, सुलक्षणा जयवंत गाडेकर या महिलेने तिच्या घरातच स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स, बेकायदेशीररीत्या साठवून ठेवली होती. आर्थिक गरज असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या प्रक्रियेसाठी तयार केले जात होते.
डॉक्टरांचा योग्य सल्ला न घेता महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत होते, अशी माहिती पोलिस तपासात मिळाली आहे. या इंजेक्शन्समुळे गर्भाशयातील स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना आयव्हीएफ किंवा एआरटी सेंटरमध्ये पाठवित होते. या प्रकरणात अधिक तपास बदलापूर पोलिस करत आहेत.




