पुण्यामध्ये काँग्रेसच्या प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण; पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

SHARE:

पुणे – पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकत्याला मारहाण करण्यात आली आहे. तर पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली आहे. याप्रकरणात काल काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण झाली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे, आरोपी दामगुडे आणि इतर आरोपींना पुणे पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काल हिंदुत्त्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

काल सायंकाळी ५ वाजता मित्रमंडळ चौकाजवळ ही घटना घडली आहे. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी तुषार दामगुडे यांच्यावर केला आहे. पूण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता तुषार दामगुडेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तुषार दामगुडेजवळील परवानाधारक शस्त्र पुणे पोलिसांनी जप्त केले आहे. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी गृहमंत्रिपदाचा गैरवापर केला आहे. तरीदेखील आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पुण्यातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत आहोत. पूणे पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केल्यावर नोटीस देऊन सोडून दिले आहे, ही गंभीर बाब आहे.

अशा प्रकरणांत कडक शिक्षा व्हायला हवी. आमचा जीव गेल्यानंतर किंवा आमच्या कुटुंबियांवर संकट आल्यानंतरच पुणे पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न पुण्यातील काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच तुषार दामगुडेला परवानाधारक पिस्तूल स्वतःच्या संरक्षणासाठी देण्यात आले आहे की, समाजातील इतर लोकांना दमदाटी करण्यासाठी, याचीही कायदेशीर चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली आहे.

हनुमंत पवार आणि तुषार दामगुडे एका कार्यक्रमासाठी आलेले होते. कार्यक्रम संपल्यावर सुरुवातीला दामगुडे बाहेर पडले. त्यानंतर फोनवर बोलत पवारही बाहेर येत होते. मित्रमंडळ चौकाजवळ आधीच फुटपाथवर बाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना आवाज देऊन बोलावले आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत यांना मारहाण केली आहे.

अचानक घडलेल्या प्रकारामुळे काँग्रेस प्रवक्ते हनुमंत आपला बचाव करण्यासाठी कार्यालयाच्या सुरक्षारक्षकांकडे धावले आहेत. दामगुडे पिस्तुलाने धमकावत असल्याचे ते मोठ्याने सांगत होते. मात्र दामगुडे हे त्यांच्या सहकाऱी मित्रांसह दुचाकीवरून पळून गेले. तर या घटनेबाबत काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, दामगुडे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी मित्रमंडळ चौकाजवळ आधीच कार्यकर्त्यांना बोलावून ठेवले होते बाहेर आल्यावर त्यांनी मला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबतही त्यांनी शिवीगाळ केली आहे. दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली आहे. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी ॲड. अभय छाजेड, प्रशांत जगताप आणि कार्यकर्ते स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी गेले. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा