पुणे – पुण्यातील विमाननगर परिसरात स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या घटनेत भीतीने मॅनेजर आणि महिलेची खिडकीतून उडी टाकली आहे, त्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या द रुटस स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली आहे. पुण्यात पोलिसांच्या कडक कारवाईत एका महिलेने आणि मॅनेजरने खिडकीतून उडी मारली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे, तर मॅनेजर जखमी झाला आहे.
पोलिस अटक करतील या भीतीने महिलेने आणि मॅनेजरने उडी मारली आहे. मात्र यामध्ये महिलेचा जीव गेल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत गंभीर जखमी अवस्थेत महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे येथील विमाननगर परिसरातील द रुटस स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकताच महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.
तर व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विमाननगर पोलिस स्टेशनच्या पथकाने दुपारी स्पा सेंटरवर कारवाई केली आहे. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वी तिचा मृत्यू झाला आहे. व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे शहरात अनेक ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. नंतर ही कडक कारवाई केली आहे.
या घटनेनंतर पुणे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून स्पा सेंटरचे परवाने, कर्मचारी नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. पुण्यातील संबंधित ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याच्या तक्रार मिळाल्यानंतर ही धाड टाकण्यात आली होती. या प्रकरणी स्पा सेंटरचा व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
तिच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे. या ाटनेबाबत स्पा सेंटरचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि इतर संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित स्पा सेंटरमध्ये मध्ये देहविक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय केला जात होता, अशी पोलिसांना माहिती मिळाली होती.




