भाजपचा मुस्लिम द्वेष, माजी खासदाराने नाव विचारून मुस्लिम महिलांकडून घेतले ब्लँकेट वापस

SHARE:

राजस्थान – भाजपचे अनेक नेते मुस्लिमांविरोधात भडकाऊ भाषणे देतात. यामुळे या पक्षाचा मुस्लिम द्वेष लपून राहिलेला नाही. आता तो पुन्हा एकदा समोर आला आहे. राजस्थानच्या टोंक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुखबीर सिंह जोनापुरिया यांनी मुस्लिम महिलांना वाटण्यात आलेले ब्लँकेट त्यांची नावे विचारून परत घेतले. ही घटना निवाई भागातील करेडा बुझुर्ग गावात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेवरून त्यांच्या मनात मुस्लिमांबद्दल किती द्वेष असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.
सुखबीर सिंह जोनापुरिया यांनी रविवारी सीता-राम मंदिराजवळ गरिबांसाठी ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. ब्लँकेट वाटप करताना सुखबीर सिंह जोनापुरिया यांनी बसलेल्या महिलांनी नावे विचारली. यावर एका महिलेने सुकरन खान असे म्हणताच. माजी माजी खासदार संतापले. त्यांनी महिलेला सांगितले कि बाजूला सरका आणि ब्लँकेट इथेच सोडा. स्थानिकांनी याविषयी माजी खासदारांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम होता, सरकारी योजना नाही.

ते म्हणाले कि मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांना ब्लँकेट मिळणार नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त झाला. सोमवारी गावकऱ्यांनी गावाच्या चौकात जौनापुरियाचा पुतळा जाळून निषेध केला. गावकऱ्यांनी यापूर्वीही निषेध केला होता, परंतु जौनापुरिया यांनी सांगितले की तो स्वतःच्या मर्जीने ब्लँकेट वाटतात आणि गाडीतून निघून गेले. या वादामुळे स्थानिक राजकारण आणि सामाजिक भावना भडकल्या आहेत आणि ही घटना माध्यमांमध्ये बरीच चर्चेचा विषय बनली आहे.

या घटनेनंतर भाजप नेते सुखबीर सिंह जौनपुरिया यांना देशभरातून टीकेचा भडीमार केला जात आहे. स्थानिकांनी त्यांच्या वृत्तीवर टीका करत म्हटले आहे की आम्ही भीक मागू, पण द्वेष पसरवणाऱ्या लोकांकडून आम्हाला ब्लँकेट नको आहेत. म्हणूनच संपूर्ण गाव तुमचे ब्लँकेट परत पाठवत आहे. स्थानिकांनी पुढे म्हटले आहे की हिंदू-मुस्लिम बंधुत्वाला हानी पोहोचवणारी कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही.

गावातील वडीलधारी आणि तरुणांनी एकत्रितपणे संपूर्ण गावाच्या वतीने ब्लँकेट आणि मिठाईचे बॉक्स परत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, ही कारवाई कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नाही, तर सामाजिक सौहार्द जपण्यासाठी आहे. गावकऱ्यांनी स्पष्ट केले की ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या गावातील पारंपारिक ऐक्य आणि सौहार्द भंग होऊ देणार नाहीत.

Leave a Comment

अधिक वाचा