बीड – जिल्ह्यात पून्हा गून्हेगारी वाढली आहे, बीड जिल्ह्यात महाविद्यालयातील २ बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोघी बहिणी उपचारासाठी दवाखान्यातून आल्या होत्या. अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या दोघी बहिणी परळी तालुक्यातील पोहनेर येथून माजलगावला उपचारासाठी दवाखान्यात आल्या होत्या. या दोन्ही मूली बीड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्या दोघी दवाखान्यातून बाहेर आल्यावर त्यांच्या अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बीडच्या माजलगाव शहरात दोन बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना माजलगाव शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालय, आंबेडकर चौक परिसरात घडली आहे. लहान बहिणीने आरडाओरडा केल्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. माजलगाव पोलिसांनी आरोपींना अटक केले आहे. या प्रकरणात भाग्यश्री हजारे यांच्या तक्रारीवरून दिनेश पुरुषोत्तम देवकते, मजहर सिकंदर सय्यद, रवी बिभीषण निळ अंबाजोगाई यांच्याविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या दोघी बहिणी परळी तालुक्यातील पोहनेर येथून माजलगावला आल्या होत्या. एक बहिण आजारी असल्यामुळे उपचारासाठी या दोन्ही बहिणी आपल्या मावसभावासोबत स्कुटीवरून माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात आल्या होत्या. काल दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर, बायपास परिसरात एका हूंडाई औरा एमएच १२ डब्ल्यूएक्स ४१६७ या चारचाकी वाहनाने त्यांना मध्येच अडवले आहे. या गाडीतील व्यक्तींनी दोन्ही बहिणींना जबरदस्तीने गाडीत ओढले आणि गाडी लॉक करून शहराच्या दिशेने गाडी पळवली.
परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच दोन बहिणीना वाचवण्यात आले आहे. माजलगावमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा दोघी बहिणींच्या अपहरणाचा डाव फसला आहे. महाविद्यालय परिसरातून पुढे आंबेडकर चौकात आरोपींनी जबरदस्तीने दोघी बहिणींना गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लहान बहिणीने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींना अटक झाली आहे.
या घटनेमुळे माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमूळे माजलगाव शहरातील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आता राज्यात महाविद्यालय परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी ही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात दोन बहिणींना जबरदस्तीने चारचाकीत बसवून अपहरण करण्याची ही घटना घडली आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




