भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रवीण पोटे पाटील यांचा सत्कार

SHARE:

अमरावती – राज्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची जम्बो कार्यकारणी घोषित केली. या कार्यकारणी मध्ये जुन्या चेहऱ्यांसोबत काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा वाव देण्यात आली. रवींद्र चव्हाण यांनी कुठेही कसर सोडलेली नाही. राज्यातल्या ३६ ही जिल्ह्यामधून निवडक चेहऱ्यांना राज्य कार्यकारणी मध्ये घेण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर अमरावती येथील माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची राज्याच्या उपाध्यक्ष पदावर वर्णी लावण्यात आली आहे. प्रवीण पोटे पाटील हे दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. गेल्या वर्षी कार्यकाळ संपल्यामुळे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उशिरा झाल्यामुळे सध्या ते विधान परिषद सदस्य नाहीत. तरीपण राज्याचे राज्यमंत्रीपद तसंच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिलेला आहे.

त्याचप्रमाणे अमरावती शहर अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेले आहे. शहराध्यक्ष पदावर काम करत असताना संघटन बांधणीमध्ये योग्य पद्धतीने अमरावती शहराचे संघटन त्यांनी त्यावेळेला बांधलेलं होतं. आज त्यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल अमरावती भारतीय जनता पार्टीचे संत गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष अभिजीत वानखडे, कॉटन मार्केट मंडळ अध्यक्ष सचिन नाईक, मनिष चौबे, महामंत्री अमोल आगरकर, महामंत्री आकाश दानखडे यांनी माजी आमदार प्रवीण पोटे पाटलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संत गाडगेबाबा मंडळ अमरावती भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वत्र पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Comment

अधिक वाचा