नागपूर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेतील पेपरफूटी प्रकरणात दोन आरोपींना अटक

SHARE:

नागपूर – जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेतील पेपरफूटी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील रसायनशास्त्र विषयाच्या पेपरफूट प्रकरणी नागपूर पोलिसांकडून सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद रा. हसनबाग आणि मुस्तफा खान रा. भानखेडा, नागपूर अशी या आरोपींची नावे असून आहेत.

दोघेही नागपूर शहरातील दहावी- बारावीच्या ट्यूशन क्लासचे संचालक आहेत. यापूर्वी नागपूर पोलिसांनी निशिकांत सुखदेव मून आणि फरहान अख्तर, फहीम अख्तर यांना अटक केली आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने निशिकांत मून आणि फरहान अख्तर यांना २६ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या नागपूर कॉपी प्रकरणात ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
४  जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी सांगितले आहे की, नागपूरच्या कॉपी प्रकरणात अटक करण्यात आलेले मुस्तफा खान आणि जुनैद मोहम्मद हे नागपूरच्या मोमिनपुरा परिसरातील एक्सलंट अकादमीशी संबंधित आहेत. पोलिस तपास करत आहेत की पेपर कुठून लीक झाला, त्यात बारावीच्या बोर्डाचे अधिकारी समाविष्ट होते का, आणि प्रश्नपत्रिका राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोहोचल्या का? तपासात आरोपींचे कॉल डिटेल्स, डिजिटल पुरावे आणि व्हॉटसअप चॅटस नागपूर पोलिसांकडून तपासले जात आहेत.

नागपूरमध्ये सुरुवातीला खाजगी कोचिंग क्लास शिक्षक निशिकांत मून आणि विद्यार्थी फरहान यांना अटक करण्यात आली आहे. आणखी एका विद्यार्थ्यावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका टेक वन व्हॉटसअप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विद्यार्थ्याची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला तात्पूरता जामीन मंजूर केला आहे. नागपुरमध्ये बारावीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणात ४  जणांना अटक करण्यात आली आहे, इतर आरोपींचा शोध सूरू आहे. या कॉपी प्रकरणात अधिक तपास नागपूर गून्हे शाखेचे पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा