रत्नागिरी – सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मनीष कांबळे या पोलिस अधिकार्याला २५ हजारांची लाच घेताना अटक केली आहे. अपघातामधील मृताच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी लाच मागितली होती. रत्नागिरीतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना विम्याचा दावा करण्यासाठी पोलिसांकडून आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर आवश्यक होता. त्यासाठी २५ हजारांची लाच मागण्यात आल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे.
रत्नागिरीमधील सावर्डे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक असलेले आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर फॉर्म देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने ही कडक कारवाई केली आहे. या कडक कारवाईमुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्या पथकाने केली आहे. मनीष कांबळे यांनी मागितलेल्या २५ हजार रुपयांपैकी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना सापळा रचून अटक केली आहे.
माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना विम्याचा दावा करण्यासाठी पोलिसांकडून आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर आवश्यक होता.
या कागदपत्रांसाठीच रत्नागिरीच्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ही रक्कम थेट न स्वीकारता तिसर्या व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारण्यात आली होती. या प्रकरणात मनीष कांबळेसह अभिजीत शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. सावर्डे परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात ही घटना घडली आहे.




