जगापासून लपवून ठेवलेलं असं शस्त्र इस्रायल भारताला देणार की… कुणीच वाचवणार नाही, आता पाकिस्तानचं काही खरं नाही…

SHARE:

इस्रायल : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इस्त्रायलने जगापासून लपून ठेवलेले शस्त्र चक्क भारताच्या स्वाधीन करण्याचा मोठा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक मोठे संरक्षण करार होणार आहेत. भारत आणि इस्त्रायलचे कायमच चांगले संबंध राहिले. जगभरातील देश ज्या शस्त्राची मागणी इस्त्रायलकडे करत होते ते शस्त्र भारताला पुरवण्याचा मोठा निर्णय इस्त्रायलने घेतला. हे शस्त्र ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही जास्त घातक असल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायलच्या या निर्णयाने पाकिस्तानची झोप उडाली. भारताच्या संरक्षण विभागाची मोठी ताकद वाढणार. इस्त्रायलने हे शस्त्र जगापासून लपून ठेवले होते, शेवटी भारताला देण्याचा मोठा निर्णय घेतला. गोल्डन होरायझन हवेतून सोडले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. सुखोई एसयू-30 एमकेआय सारख्या लढाऊ विमानांमधूनही त्याला सोडले जाऊ शकते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राचा वेग टर्मिनल टप्प्यात मार्क ५  पेक्षा जास्त वाढतो.

भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग मार्क ३  च्या आसपास आहे. या उच्च गतीमुळे ते रोखणे जवळपास अशक्य होते. विशेष म्हणजे इस्त्रायलचे हे क्षेपणास्त्र बंकर, मजबूत इमारती आणि अणु सुविधांमध्येही प्रवेश करू शकते. अत्यंत ताकदवार हे क्षेपणास्त्र आहे. तज्ञांचा अंदाज आहे की, त्याची क्षमता १,००० ते २००० किलोमीटर असू शकते, जी ब्राह्मोस पेक्षा खूपच जास्त आहे.

जगातील अनेक देश इस्त्रायलकडे या घातक क्षेपणास्त्राची मागणी करत होते. मात्र, इस्त्रायलने हे क्षेपणास्त्र पूर्ण जगापासून लपून ठेवले. अखेर जगापासून ठेवलेले हे घातक क्षेपणास्त्र इस्त्रायल भारताला देत असून यावरून भारत आणि इस्त्रायलमध्ये नक्की मैत्री काय आहे हे जगाने बघितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दाैऱ्यावर असून अनेक करार यादरम्यान होणार आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्त्रायलच्या दाैऱ्याचा शेवटचा दिवस आहे. काल नरेंद्र मोदी यांचा सन्मान त्यांच्या संसदेत करण्यात आला. इस्रायलने हे प्रगत तंत्रज्ञान इतर कोणत्याही देशाला दिले नाही. जगातील जवळपास लोक इस्त्रायलकडे क्षेपणास्त्र मागत असताना त्यांनी हे भारताला देण्याचा निर्णय घेतला. मोदींनी इस्रायली संसदेत म्हटले की, आजच्या अनिश्चित जगात भारत आणि इस्रायलसारख्या विश्वासार्ह भागीदारांमधील मजबूत संरक्षण भागीदारी महत्त्वाची आहे.

Leave a Comment

अधिक वाचा