पुण्यात वाहनांवरील दंड ३० दिवसांच्या आत न भरल्यास लायसन्स रद्द होणार; वाहतूक पोलिसांची मोठी कार्यवाही

SHARE:

पुणे – पुण्यात वाहनांवरील दंड ३० दिवसांच्या आत न भरल्यास लायसन्स रद्द होणार आहे, असे पुण्यातील वाहतूक पोलिस विभागाने म्हटले आहे. पुण्यात वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्याच्या वाहतूक नियमभंगाबाबत आकारण्यात आलेला दंड ३० दिवसांच्या आत न भरल्यास संबंधित वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा इशारा पुणे वाहतूक पोलिसांनी दिला आहे. वाहन चालकांनी थकित दंड तीस दिवसांच्या आत जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे.

पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या पोलिसांकडे दंड जमा करावा; असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे, दंड न भरल्यास वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची नोटीस येणार आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर अधिकृत कोडवरून एसएमएसद्वारे नोटीस पाठवण्यात येणार आहे. २७ , २८ फेब्रुवारी आणि १  मार्च या कालावधीत या सगळ्या नोटीसा पाठवण्यात येणार आहेत. यासाठी पोलिस वाहतूक विभागाने एक मोहिम हाती घेतली आहे.

रस्त्यावर थेट कारवाईसाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. मार्च २०१९ पासून पुणे शहरात ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूकीचे नियमभंग करणार्यावर दंड आकारला जात आहे. मात्र, ई-चलन मिळूनही मोठ्या प्रमाणावर पुण्यातील वाहनचालकांनी दंडाची रक्कम न भरल्याचे समोर आले आहे. पुण्यातील वाहनांची थकलेली दंडाची वसुली केली जाणार आहे. वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन आणि शहरातील वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी ही कारवाई करण्यात येणार आहे.

ई-चलन प्रलंबित असलेल्या पुण्यातील सर्व वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठविण्यात येणार आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे बंधनकारक राहणार आहे, अन्यथा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे वाहतूक विभागाने म्हटले आहे. संबंधित वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याबाबत प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

ही नोटीस वाहनमालकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर या अधिकृतकोडवरून एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. ही नोटीस २७ , २८ फेब्रुवारी आणि एक मार्च २०२६ या कालावधीत पाठविण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइटवरून ही दंड भरणे शक्य आहे. या अॅपवरून दंड भरता येतो. जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात ई-चलान मशिनवर क्यूआर कोड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांकडून कोणतीही फाइल पाठविण्यात येणार नाही. वाहनचालकांनी ओटीपी कोणालाही शेअर करू नये. केवळ नोटिसमध्ये नमूद केलेल्या अधिकृत पेमेंट पद्धतींचाच वापर करावा. याबाबत संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेश आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे पुणे वाहतूक प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा