संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

SHARE:

नवी दिल्ली – बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराडने जामिनासाठी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणाने बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आरोपी वाल्मिक कराड याने यापूर्वीही जिल्हा न्यायालय आणि हायकोर्टातही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे पाहता त्याचे सर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते.

अखेर आरोपी वाल्मिक कराडने सुप्रीम कोर्टात जामिनासाठी दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टाने आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सवलत मिळू नये, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून केली जात होती. आता आरोपी वाल्मिक कराडचा तुरूंगातच मुक्काम वाढणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा