सावकाराच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील १९ शेतकऱ्यांनी किडनी विकल्याचा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा दावा

SHARE:

मुंबई – सावकाराच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील १९ शेतकऱ्यांनी किडनी विकल्याचा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी दावा केला आहे. राज्यातील १९ शेतकऱ्यांसोबत ही भयानक घटना घडली आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडलेली आहे. या घटनेविराधात काँग्रेसच्या नेत्यांकडून अधिवेशनातही संताप व्यक्त करण्यात आला आहे. हे वास्तव स्वीकारून राज्यसरकारने शेतकऱ्यांना मदत करायला हवी आणि खासगी सावकारांवर कडक कारवाई करायला हवी, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

नाहीतर एक किडनी काढणारे खासगी सावकार उद्या राज्यातील शेतकऱ्याच्या शरिराचा लिलाव करायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत. काही दिवसांपूर्वी खासगी सावकाराने राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका तरुणाची किडनी विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांसोबत भयानक असा प्रकार घडला आहे. खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील १९ शेतकऱ्यांनी आपली किडनी विकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. राज्यातला शेतकरी कसा कर्जाच्या बोझ्याखाली दाबला जात आहे, हे वारंवार समोर येते आहे. पण, हाच शेतकरी कसा खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकून मरण यातना सोसत आहे, याचे वास्तव विधानसभेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे. खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी किडनी विकल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे.

खासगी सावकारांच्या जाचामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर किती भयानक परिस्थिती ओढावली आहे, असे काँग्रेसचे नेते विधानसभेत म्हणाले आहेत. राज्यातील एका एजंटने एका शेतकऱ्याला कोलकात्याला नेले आहे. त्यानंतर कंबोडिया देशात नेऊन त्याची किडनी काढण्यात आली आहे. ही किडनी 8 लाखाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी सावकारांने शेतकऱ्याची शेती, घरातील सामान हडपले आहे. शेतकरी बांधवाला किडनी विकायला लावली आहे.

याच किडनी रॅकेटमध्ये दिल्लीतील पदमश्री अवॉर्ड प्राप्त डॉक्टरांचा समावेश आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत राज्यातील गृहविभागाच्या अहवालाचा एक संदर्भ दिला आहे. राज्यातील चंद्रपूर, अहिल्यानगर आणि सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून सावकारांनी कर्जवसुलीसाठी १९ शेतकऱ्यांना किडनी विकायला भाग पाडल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पण राज्यातील ज्या शेतकऱी बांधवांनी हे सगळं भोगले आहे, तो राज्यसरकारकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करतो आहे.

राज्यात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने हैराण होणार्या शेतकऱ्याला मदतीच्या नावाने फक्त सरकारची फुकट आश्वासने मिळत आहेत. शेतीतून उत्पन्न मिळेल या आशेमुळे तो मरत नाही, पण, कर्ज देणारे खासगी सावकार त्याला सुखाने जगू देत नाही, ही राज्यातील शेतकरी बांधवांची खरी वास्तव परिस्थिती आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत

Leave a Comment

अधिक वाचा