मुंबई – मालाडमधे फळ विक्रेत्याकडून फळांवर उंदीर मारण्याचे औषध मारल्याचा प्रकार उघड झाला आहे, तर या प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईमध्ये उंदीर फळे खातात म्हणून फळविक्रेत्याने फळांना रॅट किलर औषध मारल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ घेत असाल तर सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण मुंबईतील मालाड परिसरात फळ विक्रेताचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.
यात मालाडमध्ये एका परप्रांतीय फळ विक्रेत्याने बेजबाबदारपणे फळांवर उंदराचे औषध मारले आहे. मुंबईमधील नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो अशी घटना समोर आली आहे. यात मालाडमधील एका फळ विक्रेत्याकडून फळांवर उंदीर मारण्याचे औषधे व क्रीम लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या फळवाल्यांकडून मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. मुंबईतील मालाडमधील या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी मालाड पोलिसांनी आता फळवाल्यावर कडक कारवाई केली आहे. फळांना रॅट किलर औषध व क्रीम लावणाऱ्या २ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात दिवसाढवळ्या राज्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला आहे. मुंबईमध्ये ही घटनाघडली आहे. मुंबईतील मालाड भागातील या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक फळ विक्रेता कच्च्या फळांना पिकवण्यासाठी थेट विषारी क्रीम लावून व उंदराचे औषध मारून फळे पिकवत आहे.
फळ विक्रेता विषारी पदार्थ वापरत आहे, ते वापरल्याने नागरिकांना उलटी, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर नुकसान आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, मालाडमधील या फळ विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याची चिंता नाही. तो फळवाला मुंबईकर नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे. मुंबईतील हा फळविक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून फळविक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आणि मुंबई पोलिसांकडे केली होती.
त्यांनतर मुंबई पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फळ विक्रेत्यावर कडक कारवाई केली आहे. यात उंदीर मारण्याचे औषध व क्रीम फळांवर लावणार्या दोन फळवाल्यांना मुंबईतील मालाड पोलिसांनी अटक केली आहे. मनोजकुमार केसरवाणी, बिपीन केसरवाणी अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अनधिकृत फळवाले स्टॉल लावून फळ विकतात. कच्चे फळ लवकर पिकण्यासाठी विषारी पदार्थ लावून फळ लवकर पिकवून मग विकतात.
मात्र, अशामध्ये मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडत आहे, असा मुंबईतील स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या अशा फळविक्रेत्यांवर मुंबई पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
तर या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चौकशी केली असता, उंदरांपासून बचावासाठी प्रयोग केला आहे, असे उत्तर फळविक्रेत्याने दिले आहे. उंदीर फळे खातात, म्हणून आम्ही त्यावर औषध लावत होतो, अशी कबुली फळविक्रेत्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने जप्त केले आहेत. याप्रकरणात अधिक तपास मुंबईतील मालाड पोलिस करत आहेत.




