नाशिक – नाशिकमधील ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात आता सीआयडीकडून पून्हा तपास होणार आहे. नाशिकच्या ४०० कोटी रुपयांनी भरलेल्या २ कंटेनर चोरी प्रकरणाला नवे वळण लागले आहे. ४०० कोटी रुपयांच्या कथित प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. ४०० कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणाचा सीआयडी तपास करणार आहे. नाशिकमध्ये ४०० कोटी रूपयांचा कंटेनर चोरी झाला अशा आरोपाची घटना घडली होती.
४०० कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या बनावट नोटा होत्या, त्या दोन कंटेनरमध्ये भरलेल्या होत्या. हे दोन्ही कंटेनर नाशिकच्या घाटामध्ये चोरीला गेले आहेत, असा आरोप एका तरुणाने केला होता. या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास केला आणि तक्रार खोटी असल्याचा आरोप केला होता. पण, आता या नाशिकच्या ४०० कोटी कंटेनर चोरी प्रकरणात सीआयडीने तपास हाती घेतलेला आहे.
त्यामुळे तपासाला नवे वळण लागणार आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टवरच मोठा संशय निर्माण झाला आहे. नाशिक पोलिसांनी तक्रारदार संदीप पाटीलने खोटी तक्रार केल्याचा दावा केला होता. तर नाशिक पोलिसांच्या तपासावर तक्रारदार संदीप पाटीलनेच गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता सीआयडीकडून या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील चोरला घाटातून ४०० कोटी रुपयांचे २ ट्रक चोरीला गेल्याचे प्रकरण देशभरात चर्चेत आले होते.
कर्नाटकमधील चोरली घाटात १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला हा कंटेनर होता. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासातून ४०० कोटी रुपयांची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी, जनार्दन धायगुडे मुंबई याच्याविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी संदीप पाटील नावाच्या तरुणाने एका व्हिडीओमध्ये हा धक्कादायक खुलासा केला होता. पण, संदीप पाटील यांच्या अपहरण प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना अटक केले होते. आरोपींना कोर्टात हजर केले आणि जामीन मिळाला आहे. नाशिक पोलिसांनी प्रकरण बंद केले होते. पण, आता सीआयडी काय तपास करणार आहे.




