नागपूर – नागपूरमध्ये बारावीच्या परिक्षेत गणिताचा पेपर फुटला आहे, तर राज्यात पेपरफुटीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे, असे नागपूर गून्हे शाखेच्या पोलिस प्रशासनाने म्हटले आहे. कारण नागपुर जिल्ह्यात बारावी परिक्षेत आतापर्यत बर्याच वेळा वेगवेगळ्या विषयांचे पेपरफुटी प्रकरणे झाली आहेत. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राचा पेपर लीक झाला होता, आता परत नागपूरमध्ये गणिताचा पेपरसुद्धा फुटला आहे. राज्यातील नागपूर जिल्ह्यात बारावी पेपरफुटी प्रकरणात नवनवीन धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत.
नागपूर जिल्ह्यात पेपरफटीची प्रकरणे सुरुच आहेत. नागपूर जिल्ह्यात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत पेपर फुटी प्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणानंतर आता नागपुरमध्ये आरोपींनी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी ही नागपूर जिल्ह्यात गणिताचा पेपर फोडल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी याप्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षण मंडळ नागपूर पोलिसांशी समन्वय साधून असल्याचे डॉ. शिवलिंग पटवे यांनी सांगितले आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील काही प्रकरणात ही बारावीचा बोर्डाच्या परिक्षेचा पेपर फोडल्याचे डिजिटल पुरावे समोर आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पेपरफुटी प्रकरणात अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला होता, पोलिसांनी तो डेटा रिकव्हर केल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमध्ये १८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारावीच्या परिक्षेत पेपर लीक केल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला होता. परंतू काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला होता.
तरीही नागपूरमध्ये २१ फेब्रुवारी २०२६ रोजी या आरोपींनी गणिताचा पेपर लीक केल्याचे डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांना मिळाले आहेत. नागपूरमध्ये बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा सुद्धा पेपर लीक केल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या तपासात मिळाले आहेत. या प्रकरणात राज्यात पेपरफुटीचे मोठे रॅकेट असण्याची शक्ययता आहे, असे नागपूर पोलिस प्रशासनाने म्हटले आहे. नागपूरात ५ सदस्यीय तपास पथकाकडून बारावीच्या परिक्षेतील पेपर फुटी संदर्भात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.
बारावीच्या परिक्षेत रसायन, भौतिकशास्त्र पेपर आधी लीक झाला होता. आता परत नागपूरात गणिताचाही पेपर फुटल्याने मोठे पेपरफुटीचे रॅकेट असल्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. नागपूरच्या पेपर लीक प्रकरणात या आधीही काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या पेपरफूटी प्रकरणात पोलिसांकडून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आणखी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद रा. हसनबाग आणि मुस्तफा खान रा. भानखेडा अशा या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही ट्यूशन क्लास संचालक आहेत.
यापूर्वी नागपूर पोलिसांनी निशिकांत सुखदेव मून आणि फरहान अख्तर फहीम अख्तर यांना अटक केली होती. नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या एका मुलीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारी २०२६ला रसायनशास्त्र आणि 18 फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर लीक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात आरोपी शिक्षक निशिकांत मून, एक्सलंन्ट अकादमीचे मुस्तफा खान, जुनेद जावेद यांना अटक करण्यात आले होते. या प्रकरणात अधिक तपास नागपूर पोलिस करत आहेत.




