नवी दिल्ली – देशात सेबीच्या नावावर बनावट लेटरहेडच्या माध्यमातून पैसे वसूल करण्याचा प्रकार उघड झाला आहे, तर बनावट टॅक्स नोटीसपासून गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे, यामूळे सेबीने शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांना इशारा दिला आहे. गुंतवणुक करणाराला बनावट नोटीस येऊ शकते, अशा टॅक्स नोटीसपासून गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे, असे सेबीने म्हटले आहे.देशात सेबीने शेअरमध्ये पैसे लावणाऱ्यांना सावधान केले आहे. कारण त्यांच्या नावावर बनावट लेटरहेडच्या माध्यमातून पैसा वसूल केला जात आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना सेबीने इशारा दिला आहे की, त्यांच्या नावावर येणाऱ्या नोटीसपासून सावधान राहा.
सेबीने म्हटले की, फसवणूक करणारे सध्या सेबीच्या लेटरहेडवर बनावट नोटीस जारी करत आहेत. आणि गुंतवणुकदारांसह मोठा फ्रॉड करत आहेत. बाजार नियामकाने गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स एसटीटी भरण्याची मागणी करणार्या बनावट नोटिसांबद्दल सावधगिरी बाळगली आहे. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही नोटिसची सत्यता पडताळून पाहावी. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने म्हटले की, फ्रॉड करणारे नियामकच्या लेटरहेड तयार करुन बनावट नोटीस पाठवत आहेत आणि थकीत एसटीटी रक्कम भरण्याची विनंती करत आहेत.
देशात काही फ्रॉड करणारे वित्त कायदा, २००४ सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स एसटीटीच्या अनुपालनाची मागणी करत नोटीस जारी करत आहेत. सेबीने म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना सूचित केले जाते की, ही नोटीस सेबीने जारी केली नाही आणि या नोटीसवर कोणतेही पैसे देऊ नये. सेबीने म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना माहिती दिली जाते की, स्टॉक एक्सचेंजवर केलेल्या प्रत्येक खरेदी आणि विक्री व्यवहारावर एसटीटी आकारला जातो आणि कर ब्रोकरद्वारे वसूल केला जातो. सेबीने स्पष्ट केले आहे की, ते एसटीटी रक्कम जमा करण्यासाठी नोटीस जारी करत नाही. किंवा या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी समन्वय साधत नाही.
देशात सेबी अधिकाऱ्यांची नक्कल करून किंवा गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी बाजार नियामकाचा लोगो, सील किंवा लेटरहेडचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांंविरुद्धही सेबीने इशारा दिला आहे. सेबीने म्हटले आहे की, अशा व्यक्ती सेबीच्या नावावर पत्र, ईमेल किंवा नोटीस पाठवून मोठ्या-मोठ्या गुंतवणूकदारांसोबत फ्रॉड करत आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान होत आहेत. म्हणून, देशातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि माहिती किंवा पेमेंट मागणाऱ्या सेबीच्या पत्रांची व सूचनांची खरी सत्यता तपासून घ्यावी.
सेबीने गुंतवणूकदारांना अकाउंट हाताळणार्या किंवा निधी व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या आणि शेअर बाजारात जोखीममुक्त रिटर्न देण्याचे आश्वासन देणार्या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध केले आहे. सेबीने म्हटले आहे की, या संस्था पोर्टफोलियो किंवा अकाउंट प्रबंधन सेवा प्रदान करण्याचा दावा करतात. आणि नेहमीच गुंतवणूकदारांना ट्रेडिंग अकाउंटची माहिती मागतात. सोबतच ते नफ्यातील वाटा देखील गोळा करतात. सेबीने म्हटले आहे की, नुकसान पूर्णपणे गुंतवणूकदारांनाच उचलावा लागणार आहे. म्हणून, अशी आश्वासने आणि दावे करणाऱ्यांपासून सावध रहा, असा इशारा सेबीने दिला आहे.




