ठाणे – मुंबईतील स्त्रीबीज प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. तर स्त्रीबीज तस्करीचे ठाणे कनेक्शन उघड झाले आहे. मुंबईतील स्त्रीबीज तस्करीचे ठाणे कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. ठाण्यातील आलिशान इमारतीत स्त्रीबीज तस्करीचा अवैध प्रकार सुरु होता. याप्रकरणात बदलापूर पोलिसांकडून एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. बदलापूर स्त्रीबीज प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. ठाणे हे स्रीबीज तयार करण्याचे मुख्य केंद्र होते. ठाण्यातील गावदेवी परिसरातील राजहंस नावाच्या आलिशान इमारतीत अवैधरित्या स्रीबीज तयार करण्याचे काम सुरु होते, बदलापूर पोलिसांनी केलेल्या तपासात हे सेंटर सुरु होते.
बदलापूर पोलिसांनी तपास केला तेव्हा या येथे महिलांना बोलावून त्यांच्या गर्भात अंडी तयार केली जायची आणि नंतर त्यांची विक्री केली जायची हा सगळा प्रकार सुरु होता. राज्यातील अवैध स्त्रीबीज प्रकणाचे मुख्य काम ठाण्यात सुरु होते. मात्र ज्या परवान्यावर हे सुरु होते ते नाशिक मधील एक मोठे आयव्हीएफ सेंटर आहे. त्यांच्या नावे ठाण्यात आयव्हीएफ सेंटर उघडण्यात आले होते. या आयव्हीएफ सेंटरवर धाड टाकून बदलापूर पोलिसांनी काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. नाशिक येथील आयव्हीएफ सेंटरला नोटीस पाठवण्यात आली आहे. बदलापूर स्त्री बीज प्रकरणात पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर,मंजूषा वानखेडे आणि अश्विनी चाहुकस्वार यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या चौकशीतून ठाण्यात एका मालती हॅास्पिटलमध्ये अवैधरित्या स्त्री बीज तयार केले जात होते, याचा आता खुलासा झाला आहे.
या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणाने संपूर्ण राज्यात आरोग्य खात्यात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात नाशिक जिल्हा कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या मुंबई नाक्यावर असलेल्या मालती आयव्हीएफ सेंटरची आणि हे सेंटर ज्यांच्या नावाने चालवले जात होते त्या डॉ.. वंदना पाटील आणि डॉ. अमोल पाटील यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या मालती आयव्हीएफ सेंटरला नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या या कडक कारवाईबाबत मालती आयव्हीएफ सेंटरच्या डॉक्टरच्या बाजूने जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र नाशिक जिल्ह्यातील मुंबई नाक्यावरील मालती आयव्हीएफ सेंटर बंद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आयव्हीएफ सेंटरच्या डॉक्टरची बाजू समोर येऊ शकली नाही. मात्र, नाशिक जिल्ह्यातील दररोज सुरू असणार हे आयव्हीएफ सेंटर अचानक बंद ठेवण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे. राज्यातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिक जिल्ह्यातील कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अधिक तपास बदलापूर पोलिस करत आहेत.




