अजित पवार अपघात प्रकरणात अचानक विमान बदलणे, अचानक पायलट बदलले या गोष्टी संशयास्पद

SHARE:

बारामती – अजित पवार अपघात प्रकरणात अचानक विमान बदलणे, अचानक पायलट बदलले या गोष्टी संशयास्पद वाटत आहेत, असे विमान अपघातातील मृत पिंकी माळीच्या वडिलांनी म्हटले आहे. कदाचित माझ्या मुलीचा जीव वाचू शकला असता मृत पिंकी माळीचे वडिल म्हणाले आहेत. आम्हाला याबाबत जास्त अपेक्षा वाटत नाही. गुन्हा आहे की नाही हे पुढील प्रकरण आहे, गुन्हा दाखल करून तपास करावा आणि सत्य बाहेर काढावे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. आता महिना पूर्ण होत आहे. अजितदादांसोबत विमानात फ्लाईट अटेंडड असलेल्या पिंकी माळीचा मृत्यू झाला होता. पिंकीचे वडील शिवकुमार माळी बारामतीत मुलीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आले होते.

मी इथे आल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले होते. त्याच हॉस्पिटलमध्ये मला माझ्या मुलीची बॉडी ताब्यात देण्यात आली होती. ती वेळ आणि आजची वेळ अतिशय दुःखद आहे असे म्हणत माळी भावनाविवश झाले होते. तसेच कंपनीच्या विमानामध्ये बेकायदेशीरपणे इंधनाचा साठा होता, जर हे नसते तर कदाचित माझी मुलगी वाचली असती, असेही शिवकूमार माळी म्हणाले आहेत. शिवकुमार माळी बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये आले होते. आपल्या मुलीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मुलीचे मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी बारामतीत आलो होतो. बारामतीमध्ये येण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा मुलीची डेड बॉडी घेण्यासाठी आणि आज तिच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आलो आहे.

माझी बायको या घटनेतून बाहेर आलेली नाही, असे माळी म्हणाले आहेत. माझ्या मुलीच्या अपघाताबाबत व्हीएसआर विमान कंपनीने मला कुठलीही कल्पना दिली नाही. टीव्हीवर बातमी बघून मी बारामतीकडे आलो. आणि माझ्या मुलीची बॉडी ताब्यात घेतली. माझ्या मुलीच्या पायावरून मी तिथे बॉडी ओळखली. अजित पवार विमान अपघात प्रकरणात अचानक विमान बदलणे, अचानक पायलट बदलले, या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत, असे पिंकी माळीचे वडिल शिवकूमार माळी म्हणाले आहेत. गाडीमध्ये फ्युल घेऊन गेल्याची माहिती मला मिळाली. ही गोष्ट बेकायदेशीर आहे. ही फ्लाईट सुरत वरून आलेली होती, पूर्णपणे ही भरलेली होती. विमानात अतिरिक्त इंधन असल्यामुळे हा प्रकार घडला असावा.

इंधन कमी असते तर कदाचित माझ्या मुलीचा जीव वाचू शकला असता, असे शिवकूमार माळी म्हणाले आहेत. रोहित पवार यांनी केलेली मागणी योग्य आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करीत असून या अपघाताची शहानिशा झाली पाहिजे. रोहित पवार यांच्या मताशी मी सहमत आहे. घातपात झाला असेल तर याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे. न्यायालयीन असुद्या किंवा सीबीअयाने योग्य तो तपास करून यातील सत्य बाहेर आणले पाहिजे, अशी मागणी शिवकुमार माळी यांनी केली आहे.

मला व्हीएसआर कंपनीकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. योग्य रीतीने याबाबत चौकशी करून जो कोणी सापडेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. माझ्या मुलीला न्याय मिळेल असे मला वाटत नाही. आमदार रोहित पवार प्रयत्न करूनही याबाबत सत्यता बाहेर येत नाही. त्यामुळे आम्हाला याबाबत जास्त अपेक्षा वाटत नाही. गुन्हा आहे की नाही हे पुढील प्रकरण आहे, गुन्हा दाखल करून तपास करावा आणि सत्य बाहेर काढावे असे शिवकूमार माळी म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा