इराण-इस्रायल युद्धाचा मोठा फटका; दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

SHARE:

विश्व् – मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ने बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई या देशांमध्ये २ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC)च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

मंडळाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील सध्याच्या परिस्थितीचा विचार करून सोमवार, २ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

सीबीएससी बोर्ड मंगळवार, ३ मार्च रोजी परिस्थितीचा आढावा घेणार असून ५ मार्चपासून होणाऱ्या परीक्षांबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी अधिकृत अपडेट्ससाठी सतत संपर्कात राहावे आणि मंडळाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून या घडामोडींमुळे आखाती देशांमध्ये सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक उपक्रमांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा