आज गुरूवार, दि. ५ मार्च २०२६ ! दत्तगुरूंची कृपा कोणावर होणार, वाचा आजचे राशीभविष्य…

SHARE:

राशीभविष्य – आज ५  मार्च २०२६, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज मित्रमंडळींसाठी पैसा खर्च कराल, कुटुंबामध्ये तुमच्या शब्दाला किंमत राहील.

वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमचा उत्साह तुमच्या कामांमध्ये सुधारणा करण्यास उपयोगी पडेल.

मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज सत्ता आणि मान मिळण्याच्या गोष्टींचे आकर्षण राहील. कोणत्याही क्षेत्रात काम करीत असला तरी कामाचा उरक चांगला राहील.

कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज आर्थिक मान वाढेल, त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल, मर्दानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना उत्तम ग्रहमान.

सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिला जरा जास्तच मानी बनतील, स्वतः करीत असलेल्या कामांमध्ये नवीन संशोधन करून कौतुक मिळवाल.

कन्या रास (Virgo)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज तरुण वर्ग आपला जोडीदार निवडण्यामध्ये यश मिळेल, नोकरी व्यवसायात लाभ होईल.

तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज साहित्य संगीत इत्यादी कलेशी जवळीक साधाल आणि त्याचा आनंद घ्याल.

वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज सरकारी अडलेली कामे आवश्यक करा, नोकरीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी योजना आखाल.

धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज वारा पाहून पाठ फिरवल्यास फायद्याचे ठरेल, नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी येतील.

मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जास्त याल, अभ्यासू व्यक्ती तुमचा फायदा करून देईल.

कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये मोठ्या माणसांशी तुमची मते जुळणार नाही, त्यामुळे वाद होतील, व्यवसायात आर्थिक लाभ होतील.

मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज महिला मानापमान जगतील, तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची तुमची पद्धत नावीन्यपूर्ण राहील.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा