चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने खेलो इंडिया यांच्या मार्फत मुली व महिलांसाठी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयातील मुली, क्रीडा संस्थांमधील महिला खेळाडू, शासकीय महिला अधिकारी व कर्मचारी, क्रीडाशिक्षक, सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी महिला यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
८ मार्च रोजी सकाळी ८.१५ वाजता उद्घाटन, यानंतर सकाळी ९ वाजता १३ वर्षांखालील मुली १०० मीटर धावणे स्पर्धा, १३ ते १८ वयोगटातील मुलींची २०० मीटर धावणे स्पर्धा आणि १८ वर्षांवरील मुली व महिलांची ४०० मीटर धावणे स्पर्धा होणार आहे. वरील स्पर्धांचा नोंदणी टाईम सकाळी ८ वाजता आहे.
अटी व शर्ती : या स्पर्धांमध्ये केवळ महिलांनाच सहभागी होता येईल. खेळाडूंनी https://nsrs.kheloindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य. खेळाडूंनी संकेतस्थळावरून प्राप्त झालेले KID नंबर, स्पर्धास्थळी नोंदणी नंबर व आधारकार्ड सादर करूनच स्पर्धेत सहभागी होता येईल. खेळाडूंनी स्पर्धेच्या ३० मिनिटांपूर्वी हजर राहावे.
अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. ९४२३६७३२३२ ), खेलो इंडियाचे प्रशिक्षक रोशन भुजाडे (मो. ७७९८१७४४३५ ) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.




