अजित पवार मृत्यू प्रकरणात सीआयडी अधिकारी व रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

SHARE:

पुणे – अजित पवार मृत्यू प्रकरणात सीआयडी अधिकारी व आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे. पुण्यातील सीआयडी कार्यालयाबाहेर आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे. सीआयडी अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्यामूळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमदार रोहित पवारांचे समर्थक रविकांत वरपे आणि सीआयडी अधिकाऱ्यांध्ये सीआयडी कार्यालयात आत जाण्यावरून तीव्र शब्दांत वाद झाला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडी कार्यालयात मोठा वाद पाहायला मिळाला. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांना पाहुणचार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

तर आमदार रोहित पवार आपल्या समर्थकांसह सीआयडी मुख्यालयायत आले होते. त्यावेळी सीआयडी पोलीस अधिकारी आणि आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला आहे. आमदार रोहित पवार आपल्या समर्थकांसह सीआयडी कार्यालयात दाखल झाले अहोते. सीआयडी अधिकाऱ्यांनी सुरक्षेचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आत घेण्यास स्पष्ट मनाई केली होती. आमदार रोहित पवार आणि अन्य ७ जणांनाच आत जाण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी आमदार रोहित पवारांचे समर्थक रविकांत वरपे आणि सीआयडी अधिकाऱ्यामध्ये आत जाण्यावरून वाद झाला.

त्यामुळे काही काळ सीआयडी कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्हीएसआर विमान कंपनीच्या कंपनीचे मालकाला चौकशीसाठी बोलावले आहे की पाहुणचार करण्यासाठी बोलावले आहे, असा प्रश्न रोहित पवारांनी सीआयडी अधिकार्यांना विचारला आहे. अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाची चौकशी केली जात आहे की त्याची पाहुणचार केला जात आहे? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंह सकाळी ११ वाजल्यापासून कार्यालयात आले होते.

अजित दादा विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर विमान कंपनीचे मालकाची 8 तास चौकशी झाल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात सीआयडी अधिकार्यांनी त्यांचा पाहुणचार करण्यातच वेळ घालवला आहे, असा दावा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केला आहे. रात्रीच्या वेळी काळ्या काचा असलेल्या पोलिसांच्या गाडीतून व्ही. के.सिंह यांची एखाद्या पाहुण्यासारखी पाठवणी का केली गेली? यामागे नक्की कोणते ’कारण आहे? काही संशयित कारण आहे का? असा प्रश्न आमदार रोहित पवारांनी विचारला आहे.

व्हीआयपी वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रोहित पवार यांनी सीआयडी प्रशासनावर टीका केली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, कितीही काळे पडदे टाकून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, तरी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार विमान अपघात प्रकरणात गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांना सोडणार नाही, आता आम्ही शांत बसणार नाही

Leave a Comment

अधिक वाचा