इराणने अमेरिकेची उडवली झोप; जॉर्डनमधील यूएसचं हवाई तळ केले उद्ध्वस्त

SHARE:

विश्व – अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध सलग आठव्या दिवशीही सुरूच आहे. केवळ चार ते पांच दिवसांत युद्ध समाप्त करू अशी शक्यता वर्तवणार्या अमेरिकेला इराणने चांगलाच घाम फोडला आहे. इराणचे नेते खेमेनेई यांचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराणने मध्ये आशियात असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष करण्यास सुरूवात केली. इराणने मध्य आशियातील अनेक देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त केले आहे. यानंतर आता इराणने जॉर्डनमधील मुवाफ्फाक साल्टी एअर बेसवर तैनात अमेरिकन थार मिसाइल बॅटरी रडार पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. यामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे.

सुरुवातीला ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालटाची भाषा केली, त्यानंतर इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखण्याचे कारण दिले. त्यांनी युद्धाची कालमर्यादाही वारंवार बदलली. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर पहिला बॉम्ब टाकला आणि यानंतर युद्धाला सुरूवात झाली. यानंतर
अमेरिका-इस्रायलने गेल्या शनिवारी संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणने इस्रायलसह मध्य पूर्वेतील आखाती देशांमधील अमेरिकन अनेक महत्त्वपूर्ण सैन्य तळांवर अचूक हल्ले केले. त्यात अमेरिकन रडार सिस्टमला मोठे नुकसान झाले. आता जॉर्डनमधील मुवाफ्फाक साल्टी एअर बेसवर तैनात अमेरिकन थार मिसाइल बॅटरी रडार पूर्णपणे इराणी हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहे. हे अमेरिकेचे एक प्रमुख केंद्र आहे. जॉर्डनमधील थार रडार सिस्टमच नव्हे तर कतारच्या उम्म दहाल येथील अमेरिकन उत्पादित अर्ली वॉर्निंग रडार सिस्टमचेही नुकसान झाल्याची बातमी आहे.

तीन दिवसांपूर्वी इराणने अमेरिकन रडार यंत्रणेचे ‘नाई सेंटर’ मानल्या जाणाऱ्या कतारमधील अल-उदीद तळावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे आखातातील अमेरिकन सैन्य बचकाळ्यात पडले. कतारच्या संरक्षण मंत्रालयानुसार, एका इराणी बैलिस्टिक मिसाईलने अल-उदीद एअर बेसवर हल्ला केला. यात अल- उदीद लष्करी तळाला मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय इराणी ड्रोनने सौदी अरेबियातील सीआयप स्टेशनवर हल्ला केला, यानंतर इराणव्या बॅलिस्टिक मिसाईल्सच्या टप्यात येणारी आपली सर्व स्टेशन्स रिकामी करण्याचे आदेश सीआयएने दिले आहेत.

इराणच्या दाव्यानुसार, आतापर्यंत ६५० अमेरिकन सैनिक मृत्यू आणि मध्य पूर्वेतील अनेक लष्करी तळ उद्धवस्त झाली आहेत.
दोन दिवसांपूर्वी अमेरिकी पाणबुडीने इराणी जहाजावर श्रीलंकेतील गाले शहराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ हल्ला केला. यात इराणच्या ८७ सैनिकांचा मृत्यू झाला तर ३२ नौसैनिकांना वाचविण्यात यश आले. यानंतर आता इराणने आता इस्रायलच्या परमाणु केंद्रांना टार्गेट करण्याची धमकी दिली. त्यामुळे केवळ इस्रायलच नाही तर अमेरिकेला देखील धडकी भरली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा