मुंबई – महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या त्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेच्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील २ विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. भारतात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. बारामतीतील दोन्ही जागांच्या निवडणुका होणार आहे.
राज्यात पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्हयातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुका होणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. भारतात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक पार पडणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांना ६ महिन्यांत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.
त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीमधून पोटनिवडणूक लढवणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार हे राज्यसभेवर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे गेल्यावर्षी निधन झाले आहे. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला आहे.




