अलिगडमध्ये भाजप नेत्याची गुंडगिरी, दिवसाढवळ्या शेजाऱ्यावर रोखली पिस्तूल

SHARE:

उत्तर प्रदेश – अलीगढ जिल्ह्यात एका भाजप नेत्याने आपल्या शेजाऱ्याच्या छातीवर पिस्तूल रोखल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी भाजप नेत्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बन्ना देवी पोलिस स्टेशन परिसरातील रघुवीरपुरी येथे घडली. आरोपीचे नाव हेमंत गर्ग असे असून तो भाजपचा नेता आहे. आरोपीचा त्याच्या शेजार्यासी काही कारणावरून वाद झाल्याचे वृत्त आहे. यामुळे संतप्त होऊन आरोपीने हेमंत गर्गने शेजारचा रहिवासी विशालच्या छातीवर पिस्तूल रोखली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, आरोपीने त्याच्या शेजाऱ्याला मारण्याच्या उद्देशाने त्याचे परवानाधारक पिस्तूल त्याच्या छातीवर रोखल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तथापि, आरोपी गोळीबार करण्यापूर्वीच, एका जवळच्या व्यक्तीने धाडसाने त्याच्याकडून पिस्तूल हिसकावून घेतले. या भयानक दृश्यामुळे परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका स्थानिक व्यक्तीने संपूर्ण घटना त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

शहर मंडळ दोनचे अधिकारी कमलेश कुमार यांच्यानुसार, ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ : ३०० वाजता बन्ना देवी पोलिस स्टेशनला रघुवीर पुरी येथे दोन पक्षांमध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली. हेमंत गर्गने त्याचा परवानाधारक पिस्तूल त्याच्या शेजारी विशाल यांच्या छातीत रोखला. त्यांच्या मते आरोपी हेमंत गर्गला ताब्यात घेण्यात आले आहे. पीडिताने पोलिसांकडे तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.पोलिसांनी तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तुरूंगाता रवानगी केली.

Leave a Comment

अधिक वाचा