विश्व – इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध दीर्घकाळ चालले तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे, असे कतारचे उर्जा मंत्री साद अल काबी यांनी म्हटले आहे. युद्ध लांबले तर जगासाठी धोकादायक आहे. इराणमधील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे, तर तेलाच्या किमती १५० डॉलरपर्यंत जाण्याचा इशारा कतारचे उर्जा मंत्री साद अल काबी यांनी दिला आहे. यामुळे भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध दीर्घकाळ चालले तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. तर कच्च्या तेलाच्या किमतींनी 90 डॉलरचा स्तर पार केला आहे.
मात्र कतारचे उर्जा मंत्री साद अल काबी यांच्या मते किमती १५० डॉलरपर्यंत किंमती वाढू शकतात. भारतासाठी ही चिंतादायक बाब आहे, कारण अंदाजानुसार कच्च्या तेलाच्या किमतीत प्रत्येकी १० डॉलर वाढ झाल्यास जीडीपीवर अर्धा टक्का परिणाम होऊ शकतो. म्हणजेच सध्याचा संघर्ष भारताच्या जीडीपीवर मोठा परिणाम करू शकतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी वाढू शकते आणि शेअर बाजार आणखी घसरण्याची शक्यता आहे. कतारचे ऊर्जा मंत्री यांनी सांगितले की, जर या भागात संघर्ष सुरूच राहिला तर जगभरातील आखाती देशांतील ऊर्जा उत्पादकांना कच्च्या तेलाच्या बाबत जाहीर करावे लागू शकते, की युध्दाच्या परिस्थितीमुळे कंपन्यांना आपल्या कच्च्या तेलपुरवठ्याच्या जबाबदार्या पूर्ण करता येणार नाहीत.
त्यांनी सांगितले की सध्या ज्या कंपन्या जाहीर करत नाहीत, त्या देखील येत्या काही दिवसांत तसे करण्यास भाग पडू शकतात. जर कंपन्यांनी तसे केले नाही, तर नंतर त्यांना कायदेशीर जबाबदाऱ्या आणि मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. मार्च महिन्यातील पुढील २ ते ३ आठवड्यांपर्यंत टँकर आणि जहाजांना या मार्गावरून जाणे शक्य झाले नाही, तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १५० डॉलरपर्यंत वाढू शकतात. त्याचबरोबर नैसर्गिक वायूच्या किमतीही वाढून ४० डॉलर प्रति एमएमबीटीयूपर्यंत जाऊ शकतात, जे युद्धापूर्वीच्या पातळीपेक्षा जवळपास ४ पट जास्त आहे.
एएनआयच्या अहवालानुसार कमोडिटी रिसर्च प्रमुख यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमतीत प्रत्येकी 10 डॉलर वाढ झाल्यास भारताच्या जीडीपीवर सुमारे ०.५ टक्के परिणाम होऊ शकतो. अलीकडेच किमती १० ते १५ डॉलरने वाढल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम येत्या काळात आर्थिक घडामोडींमध्ये आणि जीडीपीच्या आकडेवारीत दिसून येऊ शकतो. बाजारात फक्त समुद्री मार्ग बंद होण्याचा धोका नाही, तर विमा प्रीमियम आणि मालवाहतुकीचा खर्चही झपाट्याने वाढत आहे. अनेक शिपमेंट पर्यायी मार्गाने पाठवली जात आहेत, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वॉर प्रीमियम जोडला गेला आहे आणि बाजारातील अनिश्चितता वाढली आहे. युद्ध आणखी तीव्र होऊ शकते.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या ७ व्या दिवशी प्रदेशातील अनेक भागांत मोठ्या हल्ल्यांची नोंद झाली आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवरील हल्ले वाढवले आहेत. इस्त्रायलने दावा केला आहे की, त्यांनी इराणमधील तेहरान येथे अशा बंकरवर हल्ला केला ज्याचा वापर इराणचे वरिष्ठ नेतृत्व करत होते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार इराणकडून करण्यात येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये ९० टक्के आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये ८३ टक्कयांची घट झाली आहे. त्यामुळे आखाती देशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर हे इराण व अमेरिका युद्ध लांबले तर जगासाठी धोकादायक आहे, असे कतारचे उर्जामंत्री म्हणाले आहेत.




